शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अखेर परभणीत चारा छावणीला मंजुरी

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ मे रोजी जिल्ह्यातील पहिल्याच चारा छावणीला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे़

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ मे रोजी जिल्ह्यातील पहिल्याच चारा छावणीला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे़ गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे ही चारा छावणी सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे़ परभणी जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी चारा छावण्या सुरू करणे गरजेचे आहे़, असा अहवाल जिल्हा पशूसंवर्धन विभागाने मार्च महिन्यातच दिला होता़ जिल्ह्यामध्ये ३९ मंडळ कार्यालये आहेत़ त्यापैकी ३० मंडळ कार्यालयात चारा उपलब्ध नसल्याचे या कार्यालयाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने साखर कारखाने, सेवाभावी संस्थांना चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले होते़ परंतु, तब्बल दीड महिन्यापर्यंत प्रशासनाकडे एकही प्रस्ताव आला नाही़ परिणामी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम राहिला़ मागील आठवड्यात राणीसावरगाव येथील एका संस्थेने चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता़ हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला़ त्यानुसार १६ मे रोजी विभागीय आयुक्तांनी राणीसावरगाव येथील संगमेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला चारा छावणी सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे़ २० आॅगस्ट २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्थीनुसार ही मंजुरी देण्यात आली आहे़ एका चारा छावणीत किमान ५०० ते ३००० जनावरांच्या चाऱ्यांच्या सुविधा उपलब्ध होऊ शकते़ या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे राणीसावरगाव परिसरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ (प्रतिनिधी)