शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पैठण तालुक्यातील जि. प. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत झाले जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:22 IST

जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन हे राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत; पण प्रशासनाकडून शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी आग्रही राहिले. शिक्षक सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेताच पैठण तालुक्यातील शिक्षकांचे वेतन नुकतेच राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करण्यात आले.

ठळक मुद्देउदासीनता : जि.प. प्रशासनाकडून सूचनांना केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन हे राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत; पण प्रशासनाकडून शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी आग्रही राहिले. शिक्षक सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेताच पैठण तालुक्यातील शिक्षकांचे वेतन नुकतेच राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करण्यात आले.यासंदर्भात शिक्षक सेनेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करण्यासाठी जि.प. प्रशासनाला निवेदने दिली. धरणे आंदोलने केली होती. गेल्या आठवड्यात पैठण तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अफजाना खान यांना शिक्षक सेनेच्या तालुका पदाधिकाºयांनी यासंबंधीचे निवेदन सादर केले होते. निवेदनाची दखल घेत गटशिक्षणाधिकारी खान यांनी जानेवारी महिन्याचे वेतन शिक्षकांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यावर जमा केले. यापुढे प्रत्येक महिन्याचे वेतनही अशाच पद्धतीने राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याची ग्वाही संघटनेच्या पदाधिकाºयांना दिली.आतापर्यंत गटविकास अधिकाºयांच्याकडून गटशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाºयांच्याकडून केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्रीय मुख्याध्यापकांकडून शालेय मुख्याध्यापक व शेवटी मुख्याध्यापकांकडून शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होत असे. वेतन जमा करण्याच्या या शृंखलेचा प्रवास दीर्घकाळ चालत असल्यामुळे वेतनाला दिरंगाई होत असे. अनेक वेळा पगार घेण्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून सहकारी बँकेत हेलपाटे मारावे लागत होते. आता गटशिक्षणाधिकाºयांकडून थेट शिक्षकांच्याच बँक खात्यात वेतन जमा झाल्यामुळे मोठा त्रास कमी झाला असून शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख अमोल एरंडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, कैलास मिसाळ, पांडुरंग गोर्डे, अमोलराज शेळके, शिवाजी दुधे, देवीदास फुंदे, गजानन नेहाले, रामभाऊ हंडाळ, लक्ष्मणराव गलांडे, श्रीकांत गमे, रऊफ पटेल आदींनी गटशिक्षणाधिकाºयांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.