शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

अखेर ठिबक सिंचनासाठी ३ कोटींचे अनुदान प्राप्त

By admin | Updated: December 11, 2014 00:40 IST

भोकरदन : भोकरदन - जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेल्या दोन वर्षापासून थकित असलेला ठिबक सिंचनाचा ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ़ संतोष दानवे यांनी दिली आहे़

भोकरदन : भोकरदन - जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेल्या दोन वर्षापासून थकित असलेला ठिबक सिंचनाचा ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ़ संतोष दानवे यांनी दिली आहे़भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी ठिबक सिंंचन व तुषार संच शेतात बसविले आहेत. मात्र गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान शासनाकडे थकित होते. या शेतकऱ्यांचे थकित असलेले अनुदान तात्काळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औरंगाबाद भेटीमध्ये आपण पाठपुरावा करून या शेतकऱ्याना थकित असलेल्या अनुदानाची रक्कम देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील २०१२ - १३ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना सुध्दा लवकरच थकित अनुदानासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आ़ संतोष दानवे यांनी सांगितले़ या अनुदानामध्ये भोकरदन तालुक्यातील ५०० शेतकऱ्याना १ कोटी ८७ लाख ९५ हजार रुपये तर जाफराबाद तालुक्यातील २०० शेतकऱ्यांना १ कोटी रूपये निधी उपलब्ध झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सन २०१२ - १३ मध्ये पहिल्या टप्प्यात शेतावर ठिबक सिंंचन केले आहे, अशा शेतकऱ्यांनी भोकरदन व जाफराबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजूर असलेल्या रक्कमेचा धनादेश लवकरच मिळणार आहे. (वार्ताहर)२०१२-१३ या वर्षाचे ठिबक सिंचनाचे १३५७ शेतकऱ्यांचे पाच कोटी ३० लाखांचे अनुदान थकले होते. त्यापैकी ७०० शेतकऱ्यांना तीन कोटींचे अनुदान पहिल्या टप्प्यात मंजूर झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील ६५७ शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा आहे. जाफराबाद तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.़४दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे म्हणून पाठपुरावा सुरू असल्याचे आ. दानवे यांनी सांगितले. ते अनुदानही लवकरच मिळेल असा विश्वास व्यक्त केला.