शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रामलीला मैदानावरील अतिक्रमण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 16:56 IST

महसूल विभाग व नगरपालिकेच्या वतीने सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली.

ऑनलाईन लोकमत
 
हिंगोली : रामलीला मैदानावरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वत:हून  काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र; यास न जुमानत अतिक्रमण जैसे थे होते. यामुळे आज महसूल विभाग व नगरपालिकेच्या वतीने सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. 
 
पालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी ४ जुलै हि तारीख निश्चित करण्यात आली होती.  परंतु; या दिवशी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण पोलीस बंदोबस्त नर्सी येथे होता. यामुळे या हि मोहीम तेव्हा रद्द झाली होती. ती  काढण्यात येणाºया अतिक्रमणाची अजूनही तारीखी निश्चित झालेली नसली तरी महसूल विभागाने मात्र शनिवारी अगदी सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांना पळता भुई थोडी झाली होती.
 
पोलीस बंदोबस्त असल्याने अतिक्रमणधारक आपलेच दुकान असल्याचे सांगण्यासही घाबरत होते. अतिक्रमण मोहीम सुरु असतानााच काही अतिक्रमणधारक धाडस करुन दुकानातील साहित्य इतरत्र हलविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आॅटो, टेम्पो, हातगाडा, बैलगाडी अशा मिळेल त्या वाहनाचा आधार घेत जिवाच्या आकांताने त्यांची खटाटोप सुरू होती. तर दुसरीकडे जसजसा जेसीबी जवळ येत होता, तशी काळजात धडकी भरत होती.
 
यात अनेकांनी केवळ महागड्या वस्तू वाचविण्याचा प्रयत्न केला. जेसीबीसमोर जे दुकान येईल, त्याचा संपूर्ण नायनाट केला जात होता. अनेक खोके तर जागीच दाबले. पत्र्याचे शेड पाडले. लोखंडी पक्के शेडही यात धाराशाही पडले.  अतिक्रमणावर जेसीबी फिरविल्यानंतर नागरिक बोंब ठोकत होते. मात्र पोलीस सतर्क व तगड्या संख्येत असल्याने काहीच तरणोपाय नव्हता. काहीजण तर बस्तान हलविताना पडून जखमीही झाले. तसेच या ठिकाणी मोठा जमाव जमला होता.
 
सकाळी सात वाजता सुरु झालेली अतिक्रमण मोहीम दुपारी १ च्या सुमारास शांत झाली होती. नेहमीच गर्दी असलेल्या  रामलीला मैदानावरील दुकाने हटविल्याने, मोकळे मैदान तयार झाले. मात्र जेसीबीच्या साह्याने नुकसान झालेल्या दुकानाचे साहित्य सायंकाळपर्यंत अतिक्रमणधारक गोळा करीत होते. तर काही आहे त्या आवस्थेत सोडून आपले साहित्य नेण्यासाठी धावपळ करीत होते.  
 
सगळीकडे टप-या नेणारी वाहने
अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असताना शहरातील सर्वच रस्त्यांवर टप-या  वाहून नेणारीच वाहने, हातगाडे दिसत होते. आता यापुढे व्यवसाय कसा व कुठे करायचा, या चिंतेत हे ओझे वाहून नेत ही मंडळी डोळ्यातून अश्रुही ढाळत होती. मात्र; अतिक्रमण करूनच बस्तान असल्याने कैफियत तरी मांडायची कुठे? हाही प्रश्नच होता.