शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

अखेर संचिकांवरील धूळ झटकली

By admin | Updated: December 24, 2016 22:00 IST

उस्मानाबाद : वैद्यकीय बिले दाखल करूनही जिल्हा रूग्णालयाकडून आठ ते नऊ महिने लोटून तांत्रिक मान्यता मिळत नव्हती.

उस्मानाबाद : वैद्यकीय बिले दाखल करूनही जिल्हा रूग्णालयाकडून आठ ते नऊ महिने लोटून तांत्रिक मान्यता मिळत नव्हती. सुमारे सहाशेवर प्रस्ताव प्रलंबित होते. त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांनी आक्रम भूमिका घेतली होती. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर संबंधित लिपिकाचा टेबल बदलण्यात आला. त्यानंतर कुठे प्रक्रियेला गती आली मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या श्ांभरावर संचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. पूर्वी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावरूनच वैद्यकीय बिलांची प्रतीपूर्ती केली जात असे. परंतु, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी सदरील बिलांची तांत्रिक पडताळणी करण्याची जबाबदारी जिल्हा रूग्णालयाकडे सोपविली. कर्मचाऱ्यांना वेळेत बिले मिळावीत, हा यामागाचा उद्देश. परंतु, याच उद्देशाला मागील काही महिने हारताळ फासण्याचे काम झाले. एकेका कर्मचाऱ्याची संचिका दहा-ते बारा महिन्यांपासून संबंधित कक्षात धुळखात पडून रहात होती. वारंवार पाठपुरवा करूनही वैद्यकीय बिलांच्या संचिका निकाली निघत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आंदोलनाची भूमिका घेतली होती. स्वत: कर्मचाऱ्यांनी खेटे मारल्याशिवाय जिल्हा रूग्णालयाकडून संचिकेला तांत्रिक मान्यता मिळत नाही, असा या संघटनेचा आरोप होता. दरम्यान, ‘वैद्यकीय बिलाचे सहाशेवर प्रस्ताव प्रलंबित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. प्राथमिक चौकशीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले यांनी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माथी खापर फोडले होते. बहुतांश प्रलंबित प्रकरणे ही तत्कालीन ‘सीएस’ डॉ. धाकतोडे, डॉ. चव्हाण आणि डॉ. बाबरे यांच्या कार्यकाळातील असल्याचे त्यांनी संघटनेला दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचा ठपका ठेवित संबंधित टेबल प्रमुखाची उचलबांगडीही करण्यात आली. यानंतर कुठे संचिका निकाली काढण्याची प्रक्रिया गतीमान झाली. परिणामी मागील काही दिवसांत शिक्षकांच्या जवळपास शंभरावर संचिका निकाली निघाल्या आहेत. परिणामी मागील अनेक महिन्यांपासून वैद्यकीय बिलांच्या प्रतिक्षेत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शिक्षकांसोबतच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेही प्रलंबित आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांच्या संचिकाही तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी आता होवू लागली आहे. (प्रतिनिधी)