लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊनही बहुतांश शासकीय कार्यालयांतील उद्घाटन व भूमिपूजनाच्या कोनशिला उघड्याच ठेवण्यात आल्या होत्या. आचारसंहितेचा भंग असतानादेखील संबंधित कार्यालय प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्षच होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत करताच जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याची दखल घेत कार्यालयातील कोनशिला झाकून टाकल्या आहेत. आरोग्य संकुलातीलही उद्घानाची कोनशिला झाकण्यात आली आहे. तसेच शहरातली रस्त्याच्या कामांचे फलकही कागदाने झाकण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सक्त निर्देश दिले आहेत. त्यानुसार महसूल कार्यालयातील भूमिपूजन व उद्घाटनाच्या कोनशिला झाकल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरील पालकमंत्र्यांचा फोटोही काढण्यात आला आहे. मात्र बार्शी रोडवरील आरोग्य संकुलाच्या उद्घाटनाची कोनशिला होती. त्यावर आवरण झाकण्यात आले नव्हते. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूला इमारत उद्घाटनाची कोनशिला आहे. ही कोनशिलाही झाकण्यात आली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित केले. दोन्ही प्रशासनाने याची दखल घेत मंगळवारी कोनशिला कागद लावून झाकल्या आहेत. आचारसंहितेपूर्वी उद्घाटन व भूमिपूजनाचे कार्यक्रम लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्या भूमिपूजन व उद्घाटन कोनशिलाही उघड्याच होत्या. त्याही झाकण्यात आल्या आहेत. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनद्वारे हे उघड झाल्यानंतर प्रशासनाने मंगळवारी सकाळीच सर्वच फलक, कोनशिला, बोर्ड झाकले आहेत. (प्रतिनिधी)सकाळीच दोन्ही कार्यालयात झाकले कागदजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, नगरपालिका, क्रीडा संकुल व कार्यालय, सा.बां. कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, ग्रामीण विकास यंत्रणा, एस.टी. वरच्या जाहिराती, कृषी कार्यालय, सामाजिक न्याय भवनातील कोनशिला आदी कार्यालय व परिसरात असलेल्या कोनशिला झाकण्यात आल्या आहेत. कार्यालयातील प्रमुखांनी बोर्ड अथवा फलक उघडा राहणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. मंगळवारी सकाळीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी स्वत: थांबून कोनशिाला झाकून घेतली. तर आरोग्य संकुलातील कोनशिला आरोग्य उपसंचालक डॉ. एम. एम. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सूचना करून कोनशिला झाकून घेतली.
अखेर उघड्या कोनशिला झाकल्या..!
By admin | Updated: September 17, 2014 01:13 IST