शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर कळंब उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी

By admin | Updated: January 3, 2017 23:25 IST

कळंब : येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे़

कळंब : येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे़ ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाल्याने येथील तज्ज्ञ डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे वाढली असून, वाढणाऱ्या सुविधांमुळे रुग्णांसह नातेवाईकांची मोठी सोय होणार आहे़कळंब शहरात साधारणत: १९८७ साली ग्रामीण रुग्णालय सुरू झाले होते. परळी रोडवरील विस्तृत भूखंडावरील ग्रामीण रुग्णालयावर शहरासह लगतच्या डिकसळ भागातील जवळपास ४० हजार लोकसंख्येच्या आरोग्याचा भार आहे. याशिवाय तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रेफर होणारे रुग्ण, आपत्कालीन रुग्णही याच रुग्णालयात येतात़ दररोज किमान २५० ते कमाल ३०० बाह्यरुग्णांची याठिकाणी नोंद होते़ तर २० ते २५ आंतररुग्णांचीही नोंद होते. कुंटूबकल्याण शस्ञक्रिया, प्रस्तूतीसाठीही येथील आरोग्य सेवाही येथून पुरविली जाते़ त्यातच इमर्मजन्सी स्वरूपातील जळीत, विषप्राषण, अपघात यामधील गंभिर व तातडीचा उपचार कराव्या लागणाऱ्या व्यक्तींना तालुकाभरातून येथील ग्रामीण रुग्णालयातच रेफर केले जात आहे. वाढते रुग्ण आणि सुविधांचा अभाव, तज्ज्ञांचा अभाव यामुळे रुग्णांना अंबाजोगाई, बार्शी, लातूर, उस्मानाबादकडे रेफर करावे लागत होते़ त्यामुळे या ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी होत होती़ वाढती मागणी पाहता मराठवाडा विकास कार्यक्रमातंर्गत येथील खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेवून आॅगष्ट २०११ मध्ये इमारतीसाठी ५३ लक्ष रुपयाचा निधीही मंजूर करण्यात आला. यातून इमारत बांधकाम पूर्ण होवून २०१३ मध्ये इमारतीचा ताबा घेवून वापरही सुरू झाला होता. परंतु, श्रेणीवर्धन न झाल्याने खाटांची संख्या वाढूनही याचा रुग्णांना फायदा होत नसल्याचे दिसून येत होते. तालुकावासियांच्या मागणीला सोमवारी अखेर मुर्त स्वरूप आले़ आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी जाहीर केलेल्या १११ नव्या आरोग्य संस्थात कळंब येथील ५० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील शिराढोण येथील ग्रामीण रुग्णालाया पाठोपाठ आता कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाचाही प्रश्न मार्गी लागला आहे.