शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगपुऱ्यात रात्री फिल्मी स्टाईल लूट

By admin | Updated: September 15, 2015 00:35 IST

औरंगाबाद : नोकराच्या मदतीने कापड व्यावसायिकाची ९५ हजार रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : नोकराच्या मदतीने कापड व्यावसायिकाची ९५ हजार रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या टोळीचा प्रमुख साथीदार बॅग हिसकावतानाच पकडला गेला होता. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास स. भु. कॉलेज परिसरात घडली.नरेश साळवे, वैभव मालोदे, अमोल खेडकर, विशाल चव्हाण, विकी सोनवणे आणि प्रकाश चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, टिळकपथ येथील कापड दुकानदार मदनलाल बोरा हे रविवारी रात्री आपले दुकान बंद करून एस. बी. कॉलनी येथील घरी जात होते. स. भु. महाविद्यालयाच्या आतील गेटजवळ आरोपींनी त्यांना अडविले. धक्काबुक्की करून त्यांच्याकडील ९५ हजार रुपये रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोठ्या शिताफीने बॅग हातात पक्की धरून ठेवली आणि आरडाओरड करीत नरेशला पकडले. नरेशला पकडल्याचे दिसताच त्याचे सहकारी पळून गेले. या घटनेची माहिती नागरिकांनी क्रांतीचौक पोलिसांना दिली. पोलीस हेडकॉन्स्टेबल अन्वर शेख, पोहेकॉ. नितीन चौधरी, प्रकाश डोंगरे, संतोष मुदिराज, समद पठाण, नवनाथ परदेशी यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने अन्य आरोपींची नावे सांगितली. रात्रीतून विशाल चव्हाण, विकी सोनवणे आणि प्रकाश चव्हाणला पकडण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. अन्य आरोपी वैभव आणि खेडकर यांना सोमवारी रात्री पकडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी अमोल खेडकर हा बोरा यांच्या दुकानात कामाला होता. त्याने काही दिवसांपूर्वी काम सोडले. बोरा रोख पैसे घेऊन एकटेच घरी जातात, अशी माहिती त्याने नरेश आणि त्याच्या साथीदारांना दिली.