शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरुनही वीज जोडणी मिळेना

By admin | Updated: May 19, 2017 00:18 IST

उस्मानाबाद :एप्रिल-२०१७ अखेर जिल्ह्यातील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : अत्याधुनिक साधने तसेच ठिबकचा वाढलेला वापर यामुळे कृषी पंप वीज जोडणीची विद्युत वितरण कंपनीकडे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत वीज जोडणी मिळत नसल्याने एप्रिल-२०१७ अखेर जिल्ह्यातील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. मागील काही वर्षात शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल आहे. आधुनिक शेतीमुळे नवनव्या अवजारांचा वापर शेतीमध्ये आवर्जून केला जात आहे. त्याचे थेट फायदेही शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र अशा पद्धतीच्या शेतीसाठी शेतशिवारामध्ये वीज असणे आवश्यक असते. विशेषत: मुबलक पाणी असतानाही केवळ कृषी पंपाची वीज जोडणी झालेली नसल्याने अनेकांना शेतीला पाणी देता येत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सन २०१४ पासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ५३९ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरूनही त्यांना जोडणी मिळालेली नव्हती. २०१४-१५ मध्ये ही संख्या ८४ इतकी होती, तर २०१५-१६ मध्ये या संख्येत अनेक पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १०३८ शेतकरी वीज जोडणीसाठी पैसे भरूनही विजेची प्रतीक्षा करीत असल्याचे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आकडेवारीवरून दिसून येते. ही संख्या २०१६-१७ मध्ये आणखी दुपटीने वाढली. या वर्षात पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २५४० एवढी पोहोचली. चालू वर्षी मात्र कृषी पंप वीज जोडणीकडे विद्युत वितरण कंपनीने काहीसे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसते. एप्रिल अखेरपर्यंत २०१७-१८ मध्ये पैसे भरूनही १३६ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळालेली नाही. याबाबत राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मंडल कार्यालयाशी संपर्क साधला असता, सन २०१४-१५ व मार्च २०१४ पूर्वी पैसे भरूनही काहींना कृषी पंप वीज जोडणी मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या काही ग्राहक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सापडत नाहीत, तर काही ग्राहकांनी वीज जोडणीची आवश्यकता नसतानाही अर्ज केल्याचे दिसून येते, तर काही ठिकाणी वीज जोडणीसाठी खांब उभे करण्यासाठी गेल्यानंतर स्थानिक लोकांकडून हरकती घेतल्या गेल्याने सदर ग्राहकांना वीज जोडणी देता आली नसल्याचे सांगण्यात आले.