शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अनधिकृत शाळांविरुद्ध होणार गुन्हे दाखल

By admin | Updated: May 19, 2015 00:51 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मान्यता न घेता ४४ शाळा सुरू असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी जि. प. च्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

औरंगाबाद : जिल्ह्यात मान्यता न घेता ४४ शाळा सुरू असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी जि. प. च्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली.दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आवाहन केले की, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने दर्शनी ठिकाणी मान्यता प्रमाणपत्र लावावे. पालकांनीही पाल्यांना प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळा ही कोणता अभ्यासक्रम राबविते, याची खातरजमा करून घ्यावी. ‘सीबीएसई’ बोर्ड हे ९ वी व १० वी वर्गांशी संबंधित आहे. एखादी शाळा ही प्राथमिक विभागालाही ‘सीबीएसई’ बोर्डाशी संलग्नित दर्शवून जादा शुल्क आकारत असेल, तर पालकांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासन तसेच जिल्हा परिषदेची मान्यता न घेताच अनेक शाळा सुरू आहेत. त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली, असा प्रश्न दीपक राजपूत, रामदास कदम, ज्ञानेश्वर मोटे, समाजकल्याण सभापती शीला चव्हाण यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित केला. तेव्हा अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले की, जिल्ह्यातील अनधिकृत सर्वच शाळांविरुद्ध कारवाई करावी, तेव्हा शिक्षणाधिकारी उपासनी यांनी सर्व अनधिकृत शाळा चालविणाऱ्या संस्थाचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. जि. प. स्थायी समितीच्या बैठकीसमोर दीपक राजपूत, रामदास पालोदकर या दोन सदस्यांनी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा शिक्षणाधिकारी उपासनी यांनी सांगितले की, शिक्षकांची बिंदू नामावली अजूनही निश्चित झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाचे किती शिक्षकांची पदे रिक्त आहेत, ते अजूनही स्पष्ट होत नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा हा प्रश्न सध्या प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले.