उस्मानाबाद : स्वत:चे घर तामिळनाडू येथील लोकांना राहण्यासाठी किरायाने देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावरून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी घर मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अॅक्सा चौक खाजा नगर येथील बशीर अब्दुल बारी चौधरी यांनी जाफर सादीक अली, शेख तनीमुल अन्सारी, तंग वेलु, मुस्ताक अली (सर्व राहणार जि.करुड राज्य तामिळनाडू) यांनी स्वत:चे घर किरायाने राहण्यासाठी दिले होते. याबाबत त्यांनी पोलिसांची कसलीही परवानगी घेतलेली नव्हती. शिवाय जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे १४४ प्रमाणे आदेश लागू असल्याने या आदेशाचे उल्लघन केल्यावरून तसेच पोलिसांना माहिती दिली नसल्याने आशपाक हनीफ मोमीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात बशीर अब्दुल बारी चौधरी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
घरमालकाविरूध्द गुन्हा दाखल
By admin | Updated: November 6, 2014 01:34 IST