शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागातील संचिका गायब !

By admin | Updated: February 27, 2017 00:38 IST

लातूर : पाटबंधारे विभाग क्र. १ च्या तेरणा वसाहतीतील रेकॉर्ड रुममधून महत्त्वाचे दस्तावेज चोरीला गेले आहेत

लातूर : पाटबंधारे विभाग क्र. १ च्या तेरणा वसाहतीतील रेकॉर्ड रुममधून महत्त्वाचे दस्तावेज चोरीला गेले आहेत. निलंगा, औसा आणि लातूर तालुक्यांतील साठवण तलावाचे दस्तावेज त्यात होते. नकाशे, ब्ल्यू प्रिंट आणि अन्य कागदपत्रांचे ४६ दस्ते व अभिलेखांच्या फायली चोरीला गेल्याने पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे.औसा रोड परिसरात तेरणा वसाहत असून, या वसाहतीतील रेकॉर्ड रुममध्ये पाटबंधारे विभाग क्र. १ च्या कार्यालयाअंतर्गत असलेल्या कामकाजाचे रेकॉर्ड ठेवण्यात आले होते. संदर्भासाठी या फायली वारंवार लागत असत. मात्र अचानक १८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान रेकॉर्ड रुमचे लॉक तोडून चोरट्यांनी त्यातील ४६ दस्ते व मूळ अभिलेखांच्या फायली चोरल्या आहेत. या फायलींमध्ये नकाशे व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. औसा, निलंगा आणि लातूर तालुक्यांत झालेल्या साठवण तलावासंदर्भातील कागदपत्रे या रेकॉर्ड रुममध्ये होती. ५२ दस्ते होते. त्यापैकी ४६ दस्तावेज चोरीला गेले आहेत. लघु पाटबंधारे विभागाकडून पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत झालेली कागदपत्रे त्यात असल्याचे कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. १९८० पासूनचे रेकॉर्ड या दस्तावेजात होते. त्याची नेमकी चोरी का केली असावी? कोणी केली असेल, असा प्रश्न काही कर्मचाऱ्यांसह प्रमुखांना पडला आहे. १८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान रेकॉर्ड रुमचे कुलूप तोडून चोरी झाली. मात्र या प्रकरणाची फिर्याद २३ फेब्रुवारीला देण्यात आली. त्यानंतर पोेलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. परंतु, तपासाला अद्याप सुरूवात नाही. (प्रतिनिधी)