शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

कोरोनाविरुद्ध लढा सुरूच; अवघ्या ३६५ दिवसांत ५६ हजार नागरिकांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 12:50 IST

One Year of corona virus in Aurangabad शहरात गतवर्षी १५ मार्च रोजीच एका खासगी रुग्णालयात पहिल्या कोरोनाच्या रुग्णाचे निदान झाले होते.

ठळक मुद्देकोरोना महामारीत तेराशेवर लोकांचे बळीडाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांसह प्रशासनाकडून लढा सुरूच

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : तारीख १५ मार्च २०२०....औरंगाबादकर ही तारीख कधीही विसरू शकणार नाही. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादेत याच दिवशी कोरोनाने शिरकाव केला. या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि आरोग्य यंत्रणा हादरून गेली. वर्षभराच्या ३६५ दिवसांत एक ते तब्बल ५६ हजार रुग्णांपर्यंत जिल्ह्याने मजल गाठली, तर तेराशेवर लोकांचा दुर्दैवाने बळी गेला. वर्षपूर्ती होत आहे, पण कोरोना महामारीचे संकट अजूनही दूर झालेले नाही. डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाचा दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्टा करून त्याविरुद्ध लढा सुरूच आहे.

शहरात गतवर्षी १५ मार्च रोजीच एका खासगी रुग्णालयात पहिल्या कोरोनाच्या रुग्णाचे निदान झाले होते. परदेशातून आलेल्या प्राध्यापक महिलेचा अहवाल या दिवशी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कातील जवळपास ६०० लोकांची तपासणी केली, परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाही. हा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आणि आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एप्रिल, २०२० पासून दररोज नवे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यात अजूनही खंड पडलेला नाही. वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबर काही आरोग्य कर्मचाऱ्यांचाही बळी गेला, पण आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, रुग्णसेवेत आजही एक पाऊल पुढे आहेत.

आक्टोबर ते जानेवारीदरम्यान रुग्णसंख्या कमी राहिल्याने नागरिकांमधील कोरोनाची भीती काहीशी संपली, पण फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. प्रशासनाच्या मदतीने आराेग्य उपसंचालक डाॅ.स्वप्निल लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सुधाकर शेळके, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या उपचारासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत.

घाटीत कोरोना तपासणीची सुविधाघाटीत २९ मार्च, २०२० रोजी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र कार्यान्वित झाले आणि शहरातच कोरोनाची तपासणीची सुविधा सुरू झाली. यासाठी अधिष्ठाता डाॅ.कानन येळीकर, सूक्ष्म जीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ.ज्योती बजाज-इरावणे यांनी परिश्रम घेतले. त्यापूर्वी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठवावे लागत होते. कोरोना तपासणीसह गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी घाटीतील डाॅक्टर्स, परिचारिका महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

तब्बल १८० दिवस रोज मृत्यूजिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. त्यानंतर, १३ मेपासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. या दिवसापासून जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत गेले. जिल्ह्यात तब्बल १८० दिवसांनंतर म्हणजे ६ महिन्यांनंतर कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्युसत्राला ८ नोव्हेंबर रोजी ब्रेक लागला. त्यानंतर, काही दिवस मृत्यूचे प्रमाण घटले, परंतु आता पुन्हा एकदा रोज मृत्यू होत आहे.

मास्कची साथ कधीही सोडली नाहीमी कोरोनाबाधित आढळले, पण सुदैवाने माझ्या संपर्कातील कोणीही बाधित आढळले नाही. मला माझ्या डाॅक्टर मुलाचा मोठा आधार मिळाला. कोरोनातून बरे झाल्यानंतर मी नियमित कामकाज सुरू केले. मास्क लावल्यावर अनेक सहकारी ‘मास्क का लावता, काही होत नाही’ म्हणून खिल्ली उडवत असत, पण मी कधीही मास्क वापरणे साेडले नाही. मी लसही घेतली आहे. आज वर्षभरानंतरही कोरोनाची तीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही गांभीर्य कळले नाही, असे वाटते. नागिरकांनी पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. जबाबदारी पार पडली पाहिजे.- डाॅ.मीना सिन्हा, शहरातील पहिल्या कोरोना रुग्ण

त्रिसूत्रीचे पालन करावेप्रारंभी उपचारासंदर्भात गाइडलाइन नव्हत्या. त्यावेळी आम्ही पहिल्या रुग्णावर उपचार केले. आजही रुग्ण वाढतच आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आजही महत्त्वपूर्ण आहे.- डाॅ.हिमांशू गुप्ता, प्रशासक, सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटल

यशस्वी उपचारपहिला रुग्ण आढळला, त्यावेळी उपचारपद्धती स्पष्ट नव्हत्या. त्यामुळे थोडी भीती होती, पण रुग्णावर यशस्वी उपचार केले. त्यावेळी रुग्ण लवकर गंभीर होत असे. चालत येणारा रुग्ण गंभीर होत असे, परंतु आता तसे राहिलेले नाही.- डाॅ.वरुण गवळी, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, पहिल्या रुग्णावर उपचार करणारे डाॅक्टर

जिल्ह्यातील वर्षभरातील कोरोनाची परिस्थितीमहिना -             रुग्ण -             मृत्यूमार्च २०२० - १             -०एप्रिल २०२० - १७९             -७मे २०२० - १,३६४             -६६जून २०२० - ४,१२९             -१८५जुलै २०२० - ६,९००             -२१८ऑगस्ट २०२० - ११,१६२             -२१६सप्टेंबर २०२० - १०,९५९             -२४६ऑक्टोबर २०२० - ५,६६८             -१४४नोव्हेंबर २०२० - २,९९३             -६७डिसेंबर २०२० - २,२४९             -५६जानेवारी २०२१ - १,३ ८३             - ३३फेब्रुवारी २०२१ - ३,३७९             -३०मार्च २०२१ -            ६,३१२                        -६६

कोरोनाचे एकूण रुग्ण- ५६,६७८बरे झालेले रुग्ण- ५१,०१७एकूण कोरोना बळी- १,३३४सध्या उपचार सुरू असलेले- ४,३२७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद