शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सापडलेले पन्नास हजार रुपये युवकाने केले परत

By admin | Updated: May 29, 2017 00:33 IST

वालसावंगी :वृद्धाचे हरवलेले ५० हजार रुपये तरूणाने प्रामाणिकपणा जपत तेवढ्याच तन्मयतेने त्यांना परत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : समाजात एकीकडे पैसा हा सर्वस्व मानला जात असताना याच पैशांमुळे नाते-गोतेही दुरावले जात आहेत. मात्र, आजही समाजात काही अशी माणसे आहेत, जी पैशांपेक्षा माणुसकीचा विचार करताना दिसतात. याचाच प्रत्यय रविवारी वालसावंगी आठवडी बाजारात आला. वृद्धाचे हरवलेले ५० हजार रुपये तरूणाने प्रामाणिकपणा जपत तेवढ्याच तन्मयतेने त्यांना परत केले.भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील माणिक शेवाळे हे रविवारी सकाळी भोकदरन तालुक्यातील वालसावंगी येथील आठवडी बाजारासाठी निघाले. बाजारात पोचल्यानंतर त्यांच्या खिशातील पन्नास हजार पाचशे रुपये रस्त्यात पडले. काही अंतर पुढे गेल्यानंतर खिशातील पैसे पडल्याचे लक्षात येताच शेवाळे यांना धक्का बसला. संपूर्ण रस्त्यावर शोधाशोध करूनही त्यांना पैसे मिळाले नाही. शेवाळे यांनी वालसावंगीतील परिचितांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, किराणा व्यावसायिक राम म्हस्के या तरुणाला रस्त्यावर वृद्धाचे हरवलेले पैसे सापडले. तरुणाने प्रामाणिकपणा दाखवत सरपंच बालू आहेर यांना कुणाचेतरी हरवलेले पन्नास हजार रुपये सापडल्याचे सांगितले. आहेर यांनी म्हस्के यास सोबत घेऊन शेवाळेंचा शोध घेतला. ते पन्नास हजार ५०० रुपये त्यांना देण्यात आले. ज्या व्यक्तीचे पैसे हरवले असतील त्याची काय अवस्था असेल या विचारातूनच आपण हे पैसे परत केल्याचे राम म्हस्के यांनी सांगितले.