शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अडीच महिन्यांपासून पन्नास शिक्षक गायब

By admin | Updated: September 20, 2016 00:22 IST

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत.

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत. रेकॉर्डवर शिक्षक दिसतात; मात्र ते प्रत्यक्षात शाळेत गेलेलेच नाहीत. परिणामी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांकडून शिक्षकांच्या मागणीमुळे शिक्षण विभाग सध्या जेरीस आला आहे. जिल्हा परिषदेत सध्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न स्फोटक बनला आहे. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना रुजू करून घ्यावे, अशी मागणी करणाऱ्या शिक्षकांनी एक नवी संघटनाही स्थापन केली आहे. काही जि. प. सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचाही प्रयत्न या शिक्षकांनी केलेला आहे. अलीकडच्या काळात शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीने (आपसी) जाणाऱ्या शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर त्यांच्या जागेवर येणारे शिक्षक त्या- त्या जिल्ह्यांतून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागांवर येथून गेलेले शिक्षक तिकडे रुजूही झाले. मात्र, येथे आलेल्या शिक्षकांपैकी जवळपास ५० पेक्षा जास्त शिक्षक अद्यापही जि. प. शाळांमध्ये रुजू झालेले नाहीत. ठिकठिकाणच्या जि. प. शाळांतील शालेय समितीचे सदस्य, अनेक ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण सभापती विनोद तांबे, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांची भेट घेऊन शिक्षक देण्याची मागणी केली. शिक्षक दिला नाही तर शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही दिला. तेव्हा कुठे हा प्रकार समोर आला. आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्ह्यात आलेल्या या शिक्षकांना सोयीची शाळा हवी आहे. आपसी बदलीने आलेल्या शिक्षकांना येथून गेलेल्या शिक्षकांच्याच शाळेत अध्यापन करणे बंधनकारक आहे. पण, या शिक्षकांनी सोयीची शाळा मिळण्यासाठी सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ‘फिल्ंिडग’ लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले की, आंतरजिल्हा बदलीने (आपसी) आलेल्या शिक्षकांनी मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे गरजेचे आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून हे शिक्षक शाळेवर रुजूच झालेले नाहीत, ही गंभीर बाब आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी त्या शिक्षकांना नोटिसा बजवाव्यात. त्यानंतरही ते जर शाळेत हजर झाले नाहीत, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. उद्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविणार आहे, असेही तांबे म्हणाले.