उस्मानाबाद : रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मजुरांच्या जॉबकार्डला आधारकार्ड जोडण्याचा निर्णय शासनाने दोन महिन्यापूर्वी घेतला आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरावर ही प्रकिया सुरु झाली असून, ६ एप्रिल पर्यंत ९० हजार ८४ पैकी ४५ हजार ६४२ मुजरांचे जॉब कार्ड आधारकार्ड लिकिंग केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. रोजागर हमी योजनेतील मजुरांची ओळख पटावी व मजुरी थेट त्यांच्या खात्यावर जमा व्हावी या उद्देशाने जॉब कार्ड आणि आधार कार्डशी लिकिंग करण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेमध्ये झालेले गैरप्रकार लक्षात घेऊन शासनाने पारदर्शकतेवर जोर दिला आहे. बोगसगिरीला आळा घालण्यासाठी आणि कंत्राटदाराच्या घुसखोरीला आळा लागावा यासाठी शासनाने मजुरांच्या जॉब कॉर्डला आधारकार्डशी लिंकिग करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रोहयोचे ९० हजार ८४ मजूर आहेत. यात भूम तालुक्यात १२ हजार ३०८, कळंब २५ हजार ७८०, लोहारा ७ हजार १५४, उमरगा ६ हजार १८३, उस्मानाबाद ४ हजार ५३, परंडा ११ हजार ५५३, तुळजापूर १० हजार ६६३ तर वाशी तालुक्यात १२ हजार ३९० असे एकुण ९० हजार ८४ रोहयो मजुरांची जिल्ह्यात संख्या आहे. असून, यापैकी ४५ हजार ६४२ मुजरांचे जॉब कार्ड आधार कार्ड लिंक झाले आहेत. (प्रतिनिधी)
पन्नास टक्के मजुरांचे जॉबकार्ड झाले लिंक
By admin | Updated: April 7, 2015 01:22 IST