शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास टक्के संस्थांना लागले टाळे !

By admin | Updated: September 26, 2014 01:24 IST

उमरगा : सहकारी कायद्याचे उल्लंघन करुन अटींची पूर्तता न केलेल्या तालुक्यातील एकूण २८० विविध सहकारी संस्थापैकी १४१ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

उमरगा : सहकारी कायद्याचे उल्लंघन करुन अटींची पूर्तता न केलेल्या तालुक्यातील एकूण २८० विविध सहकारी संस्थापैकी १४१ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळानंतर तालुक्यात सहकार क्षेत्राचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते. शेती सहकार, नागरी सहकारी बँका, पगारदार पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, नागरी सहकारी पतसंस्था, तालुका खरेदी विक्री संघ, पीक पणन, सहकारी साखर कारखाने, सामुदायिक शेती संस्था, यंत्रमाग वस्त्रोद्योग बांधकाम, माल उत्पादक संघ, बलुतेदार संघ, सुतगिरणी ग्राहक भांडार, गृहनिर्माण संस्था, वाहतूक सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, पाणी पुरवठा, पाणी वापर, संवर्गीकरण इत्यादी एकूण २२४ सहकारी संस्थांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे नोंदणी केली होती.नोंदणी केलेल्या बहुतांश सहकारी संस्था या नोंदणीनंतर कागदावरच राहिल्या आहेत. ज्या संस्थांना सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालयाच्या वतीने अनेकवेळा घालून दिलेल्या सहकारी कायद्यांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यातील ७५ विविध सहकारी संस्थांनी लेखा परीक्षण अहवाल, दोष दुरुस्ती अहवाल, वार्षिक सर्वसाधारण सभा, निवडणूक प्रतिज्ञा पत्र, आॅनलाईन माहिती भरुन देणे इत्यादी कार्यालयीन नियमांची पूर्तता केली नसल्याने आशा या सहकारी संस्थांना सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ अन्वये सहाय्यक निबंधक एस.एस. कुलकर्णी यांनी अंतरिम आदेश देवून अवसायनात काढल्या आहेत. कल्लेश्वर ग्रामीण बिगर शेती कसगी, शिवप्रताप कुन्हाळी, हुतात्मा वेदप्रकाश गुंजोटी, संजय सोलंकर बलसूर, श्रमकैवारी तुरोरी, महालिंगरायवाडी, धनवर्षा, माडज, राजहंस तलमोड या आठ ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, प्रियदर्शना नागरी उमरगा, मुरुम, अभय उमरगा, जयश्री महिला उमरगा, छत्रपती शिवाजी उमरगा, महादेव उमरगा या नागरी पतसंस्थांचा समावेश आहे. उमरगा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ, यशवंत वीट उत्पादक मुरुम, जटाशंकर वीट उत्पादक, यशोनिल औद्योगिक उमरगा, साई निरा ताडगुळ उत्पादक उमरगा, ज्ञानेश्वर सह उपसा जलसिंचन, तुरोरी, बालाजी पाणीपुरवठा कराळी, सिद्धनाथ धनलक्ष्मी पाणी वापर बेडगा, जय हनुमान पाणी वापर येळी, व्यंकटेश पाणी वापर, अमृततुल्य पाणी वावर चिंचोली, श्री जय हनुमान शेती विकास पाणी वापर मातोळा, बळीराजा पाणी वापर मळगी, भटके विमुक्त ग्राहक भांडार उमरगा, बिजडोर उत्पादक मुरुम, विकास ग्राहक भांडार उमरगा, निळकंठेश्वर सहकारी गृहनिर्माण बलसूर, डिसीसी बँक कर्मचारी गृहतारण संस्था उमरगा, जटाशंकर स्वयंरोजगार मुळज, प्रदीप रंगकाम कामगार मुळज, श्रद्धा स्वयंरोजगार उमरगा, कल्पवृक्ष बहुउद्देशीय स्वयंरोजगार आलूर, गणेश बहुउद्देशीय स्वयंरोजगार आलूर, हनुमान स्वयंरोजगार मातोळा, राजश्री शाहु महाराज स्वयंरोजगार गुंजोटी, लोकसेवा स्वयंरोजगार नारंगवाडी, माऊली स्वयंरोजगार सावळसूर आदीसह ७५ विविध सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.अवसायनात काढण्यात आलेल्या विविध सहकारी संस्थानी वार्षिक अहवाल, लेखा परिक्षणे, वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती, आॅन लाईन माहिती, निवडणुका याबाबतची माहिती येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाला सादर केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ अन्वये सदरील संस्था अवसायनात काढण्यात आल्याचे सहाय्यक निबंधक संजय कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)तालुक्यातील ६६ सहकारी दूध व्यवसाय संस्थांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ व नियम १९६१ अन्वये संस्थेची आर्थिक पत्रके सादर न करणे, वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणे, लेखा परिक्षण अहवाल सादर न करणे, दोष दुरुस्ती अहवाल कार्यालयाकडे मुदतीत न पाठविल्यामुळे तालुक्यातील ६६ दुग्ध सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. यात आदर्श (कवठा), जटाशंकर (मुळज), आम्रपाली (गुंजोटी), सेवालाल (बेळंब), शिवयोगी (आलूर), श्रीकृष्ण (कोराळ), जयराम (नारंगवाडी), कामधेनू (कोरेगाव), राजहंस (त्रिकोळी), जयभवानी (भगतवाडी), धाकटीवाडी, अंबिका (बाबळसूर), शरद कलदेव (निंबाळा), कपिला (कोरेगाव), लक्ष्मी (कोरेगाववाडी), मारुती (एकुरगा), रामलिंगेश्वर (येळी), हनुमान (पळसगाव), श्रीराम (मुळज), बालाजी (कराळी), समर्थ (दाबका), शिवामृत (दाळींब), महादेव (काळनिंबाळा), अहिल्यादेवी होळकर (मुळज), श्रीराम (गुगळगाव), सिद्धेश्वर (बलसूर), भागीरथी (मातोळा), विष्णुकृपा (कवठा), कुलस्वामीनी (नारंगवाडी), कपिलधारा (मुरुम), शिवनेरी (सावळसूर), कपिला (बलसूर), गिरीजा (कराळी), आदर्श (कोळेवाडी), रुक्मिणी (येणेगूर), इंदिरा (जकेकूर), अश्विनी (नारंगवाडी), कुलस्वामीनी (बोरी), प्रियदर्शनी (कदेर), व्यंकटेश (कराळी), विजयलक्ष्मी (तुरोरी), प्रगती (तुरोरी), सरस्वती (उमरगा), राऊबाई (त्रिकोळी), शिवनेरी (एकुरगावाडी), तुळजाभवानी (एकुरगावाडी), शिवनेरी (मातोळा), विठाई (दाबका), महानंद (माडज), गिरीजा (कवठा), अंजनाबाई (कदेर), पांडूरंग (मुळज), साईकृपा (मुळज), तुळजाई (एकुरगा), कै. जगन्नाथ दासिमे (चिंचोली भुयार), तिरुपती (जकेकूर), शिवनेरी (आष्टा), शिवशक्ती (कुन्हाळी), महालक्ष्मी (जकेकूर), सिद्धनाथ (गुरुवाडी) या सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थांचा समावेश आहे.