शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बॅकवॉटरपासून पन्नास फूट खोल चर

By admin | Updated: April 8, 2017 00:18 IST

परंडा : परंडा तालुक्यासह करमाळा तालुक्याच्या असंख्य गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या सीना-कोळगाव प्रकल्पाच्या जलसाठ्यातून अवैध मार्गाने पाणी चोरी सुरू आहे.

परंडा : परंडा तालुक्यासह करमाळा तालुक्याच्या असंख्य गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या सीना-कोळगाव प्रकल्पाच्या जलसाठ्यातून अवैध मार्गाने पाणी चोरी सुरू आहे. जेसीबी,, पोकलेनसारख्या यंत्राच्या साह्याने सीना-कोळगाव धरण परिसराच्या बॅकवॉटरपासून ५० फूट खोल, ५००० फूट लांब आणि ३० फूट रूंद आकाराची भली मोठी चर खोदून त्यामधून विद्युत मोटारी व इंजीनद्वारे मोठ्याप्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यात परंडा तालुक्यावर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीना कोळगाव धरणाची साठवण क्षमता ७६.१९ दलघमी वर्ग मीटर आहे. गेल्या पाच वर्षानतंर २०१६ मध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. धरणला एका बाजूने परंडा तालुक्याने तर दुसऱ्या बाजूला करमाळा तालुक्याचा भाग लागतो. पाच वर्षानतंर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले होते. धरणात सहा महिन्यापूर्वी ७६.१९ दलघमी पाणी साठा होता; मात्र भरमसाठ उपश्याने पाण्याची पातळी खालावली आहे. डोमगाव, कौडगाव, सोनारी, डोंजा, आलेश्वर, बंगाळवाडी, तांदुळवाडी, देऊळगावसह करमाळा तालुक्यातील भालेवाडी, आर्जुननगर, मिरघवाण, हिवरे, कोळगाव, निमगाव, आवाटी, दिलमेश्वर, करंजा तसेच तांडे, वाड्यांना सीना-कोळगाव धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, येथून सध्या रात्रंदिवस पाणीउपसा सुरु असल्याने पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. दरम्यान, सद्यस्थितीत येथे १९.१७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे सीना-कोळगाव विभागाचे उपअभियंता एस. एल. मेटकरी यांनी सांगितले.