शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास फुटी ‘रावणा’चा ४० फूट व्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:20 IST

येथील ग्रामदेवता खंडेश्वरी देवस्थानातील शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील ग्रामदेवता खंडेश्वरी देवस्थानातील शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे. यावर्षी ५० फूट उंच रावण प्रतिकृती तयार केली असून त्याचा व्यास ४० फुट आहे. या रावणासाठी ७० मीटर कपडा लागला आहे.विजयादशमीच्या दिवशी खंडेश्वरी यात्रेत रावण दहनाचा कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून मोठे आकर्षण ठरला आहे. सीमोल्लंघनानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत रावण दहन केले जाते. मागील १५ दिवसांपासून रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रणजितसिंह चौहान, सचिव बापूराव चौरे, राजेंद्र बनसोडे तसेच विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण शेणकुडे, जयंत राऊत, विश्वंभर तपासे, सचिन घोडके यांच्यासह तरूण मंडळींनी परिश्रम घेतले.मागील वर्षी ३५ फुटांच्या रावणाचे दहन झाले होते. यंदा १० फुटाने वाढ करण्यात आली आहे.नवचंडी यागाची शुक्रवारी सांगता झाली. होमहवन, पूजाविधीनंतर अजाबली देण्यात आला. नवचंडी यागाने उपवासाची सांगता झाली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी चार तास महाप्रसादाचे आयोजन केले होते. ९ हजार भाविकांनी याचा लाभ घेतल्याचे विश्वस्तांनी सांगितले.दरम्यान, शनिवारी पहाटे तीन वाजता डॉ.अनिल बारकुल यांच्या हस्ते महापुजा होईल.त्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.नवरात्र महोत्सवात विविध वस्तूंसह मनोरंजनाचे खेळ आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल लागले होते.या कालावधीत दररोज हजारो भाविकांनी जत्रेचा आनंद लुटल्याचे पहावयास मिळाले. यात आबालवृद्धांचा सहभाग होता.