शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

औरंगाबादेत रंगणार पाचवा ‘फिल्म फेस्टिव्हल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:20 IST

सिनेरसिकांना पर्वणी ठरलेल्या ‘एआयएफएफ’अर्थात औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलच्या पाचव्या पर्वाची घोषणा आज करण्यात आली. १८ ते २१ जानेवारीदरम्यान हा महोत्सव प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स थिएटर येथे बदललेल्या स्वरूपात रंगणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपर्वणी: बदललेल्या स्वरुपात १८ ते २१ जानेवारीदरम्यान होणार आयोजन; पोस्टर प्रदर्शन व कार्यशाळाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिनेरसिकांना पर्वणी ठरलेल्या ‘एआयएफएफ’अर्थात औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलच्या पाचव्या पर्वाची घोषणा आज करण्यात आली. १८ ते २१ जानेवारीदरम्यान हा महोत्सव प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स थिएटर येथे बदललेल्या स्वरूपात रंगणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.मराठवाड्यातील सिनेरसिकांपर्यंत देश व जगभरात गाजलेले उत्कृष्ट चित्रपट पोहोचविणाºया ‘एआयएफएफ’चे हे पाचवे वर्ष आहे. नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे आयोजित हे पर्व नव्या बदलासह असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ‘रुख’ हा बहुचर्चित सिनेमा महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ असेल. याचे दिग्दर्शक अतनू मुखर्जी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधतील.महोत्सवादरम्यान स्पर्धा विभागातील सर्व चित्रपटांशी संबंधित दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित असतील. तसेच अभिनेते डॉ. मोहन आगाशे, मंगेश देसाई, उपेंद्र लिमये, अलोक राजवाडे, इरावर्ती कर्वे, दिग्दर्शक हंसल मेहता, गिरीश मोहिते, पटकथाकार संध्या गोखले आदी नामवंत मंडळी उपस्थित राहणार असून, या महोत्सवाचा सिनेरसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागाचे प्रमुख अंकुशराव कदम, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, महोत्सव निमंत्रक नीलेश राऊत, समन्वयक शिवदर्शन कदम, डॉ. आनंद निकाळजे, प्रिया धारूरकर यांची उपस्थिती होती.स्पर्धा गटाची सुरुवातयावेळी महोत्सवात पहिल्यांदाच ‘भारतीय सिनेमा स्पर्धा’ गटाचा समावेश करण्यात आला आहे. यात विविध भारतीय भाषांमधील ९ सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे.स्पर्धेत सर्वोत्तम चित्रपटास रोख रकमेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायाचित्रण, संकलन, ध्वनी संकलन, कलाकार (स्त्री/पुरुष) असे वैयक्तिक पुरस्कारसुद्धा देण्यात येतील. पुरस्कारांची निवड ५ आंतरराष्ट्रीय ज्युरीद्वारे करण्यात येईल. ज्युरी समितीचे अध्यक्ष दिग्दर्शक विकास देसाई असतील. तर सदस्य म्हणून प्रा. एमी कॅटलीन (अमेरिका), समीक्षक सैबल चटर्जी (दिल्ली), नाटककार अजित दळवी (औरंगाबाद ) व चित्रपट अभ्यासक सुजाता कांगो (औरंगाबाद ) हे असतील.मास्टर क्लास व परिसंवादशुकवारी (दि.१९) आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक हंसल मेहता निवडक चित्रपट अभ्यासकांसोबत मास्टर क्लासच्या माध्यमातून संवाद साधतील. तसेच शनिवारी (दि.२०) सायंकाळी ५ वाजता ‘मराठी चित्रपट व जागतिक व्यासपीठ’ या विषयावर परिसंवाद होईल. यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, संदीप सावंत, क्रांती कानडे, सुमित्रा भावे व मिलिंद भावे यांचा सहभाग असेल.पोस्टर प्रदर्शन व कार्यशाळादिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या निवडक ५० चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन सोमवार (दि.१५) पासून प्रोझोन मॉल येथे भरविण्यात येणार आहे. यासोबतच महोत्सवाआधी शहरातील १० महाविद्यालयांत समीक्षकांच्या उपस्थितीत चित्रपट रसग्रहण कार्यशाळा होईल.चित्रपटांची पर्वणीसंपूर्ण महोत्सवात सहा वेगवेगळ्या गटांमध्ये चित्रपट दाखविण्यात येतील. यात स्पर्धा गट- ९, एशियन बेस्ट- ७, वर्ल्ड सिनेमा- ५, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त- ४, हंसला मेहता यांची ३ व अमोल पालेकर दिग्दर्शित अनाहत, अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची पर्वणीच रसिकांना असणार आहे.प्रतिनिधी नोंदणीमहोत्सवात सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, शहरात ८ ठिकाणी याचे केंद्र सुरू असतील. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी सवलतीच्या दरात नोंदणी करता येईल. नोंदणी केंद्रांची नावे - १. आयनॉक्स, प्रोझोन, २. निर्मिक ग्रुप, सूतगिरणी रोड, ३. महात्मा गांधी भवन, समर्थनगर, ४. विशाल आॅप्टिकल, निरालाबाजार, ५. हॉटेल स्वाद, उस्मानपुरा, ६. हॉटेल नैवेद्य, सिडको, ७. साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा, ८. जिजाऊ मेडिकल, टी. व्ही. सेंटर.