शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा डीपींची वीज खंडित

By admin | Updated: November 7, 2014 00:42 IST

लोहारा : तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पातून अवैध पाणी उपसा शेतीसाठी सुरुच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली असून,

लोहारा : तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पातून अवैध पाणी उपसा शेतीसाठी सुरुच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली असून, प्रकल्पाच्या आजु-बाजुला असलेल्या पंधराहून अधिक अधिक डीपीवरील वीजपुरवठा गुरुवारी खंडित केला. यावेळी महसूल, पाटबंधारे, वीज वितरण कंपनीसोबतच पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पावर २२ खेडी माकणी, उमरगा, निलंगा, औसा शहर, तीस खेडी औसा, दहा खेडी मातोळा (ता. औसा) यासह शंभरावर गावचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात मागील वर्षीपासून लोकमंगल माऊली साखर कारखानाही याच प्रकल्पातून पाणी घेत आहे. मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पात सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा मृत असून तो ही ८.४ दसलक्ष घनमिटर इतकाच आहे. त्यामुळे तीन महिन्यासाठीच हे पाणी पिण्यासाठी पुरेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण प्रकल्पा शेजारील शेतकरी अवैधरित्या पाणी उपसा करत होते. याबाबत प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याचे वास्तव ५ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ मांडले होते. यावर प्रशासनाने दोन दिवसात कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार लोकमत’ वृत्ताची दखल घेत आज गुरुवारी तहसील प्रशासन वीज वितरण कंपनी व निम्न तेरणा प्रकल्प व पोलीस यांच्या सहकार्याने माकणी निम्न तेरणा प्रकल्पाच्या आजुबाजुच्या पंधरावर डीपीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. साधारण तीसवर डीपी असून, राहिलेल्या डीपीचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कारवाईत माकणी मंडळ अधिकारी बी. एस. जगताप, तलाठी जगदीश लांडगे, माकणीचे तलाठी डी. एस. कोळी, ए. ए. नळेगावे, ए. पी. बनसोडे, प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता एस. व्ही. देशमुख, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एन. व्ही. देशमुख, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पी. जी. जोगी, डी. आर. गोसावी, पोलीस सरवदे, पानढवळे, बालाजी भूमकर आदी या पथकात सहभागी झाले होते.