औरंगाबाद : वाहनात हवा भरल्याचे पाच रुपये मागणाऱ्या एका तरुणाला कारचालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.६) सादातनगर येथे घडली.शाहरुख, शाहबाज, जावेद आणि तवेरा कारचालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सय्यद मोसीन सय्यद बारी हा तरुण सादातनगर येथे टायर पंक्चर काढण्याचे दुकान चालवितो. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एका कारच्या चाकामध्ये सय्यद मोसीन यांनी हवा भरली. हवा भरल्याचे पाच रुपये त्यांनी कारचालकाकडे मागितले. तेव्हा आरोपीने अन्य तीन जणांना बोलावून घेऊन शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत मोसीन जखमी झाला. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पिकअप जीप पळविलीभारतनगर येथे उभी केलेली पिकअप जीप चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना २९ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत घडली. तक्रारदार बालसिंग नाडर यांचा भारतनगर येथे चिक्कीचा कारखाना आहे. २९ आॅक्टोबर रोजी रात्री भारतनगर येथे पिकअप जीप उभी करून ते कर्नाटक राज्यातील गावी गेले. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ते औरंगाबादला परतले असता चोरट्यांनी जीप पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले.औरंगाबाद : हर्सूलनजीक ठेल्यावर चहा घेण्यासाठी थांबलेल्या एका तरुणास भरधाव ट्रकने चिरडले. प्रवासादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या ठेल्यासमोर दुचाकी उभी करून त्यावर बसून चहा घेत असताना रविवारी (दि.६) ही घटना घडली. यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. शेख सलमान शेख युनूस (१९, रा. हर्सूल सावंगी, मठपाटी) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शेख सलमान खडी विक्रीचे काम करायचा. रविवारी सकाळी सलमान हा त्याच्या मित्रांसह मोटारसायकलने औरंगाबादकडे येत होते. मठपाटीजवळ ते चहा पिण्यासाठी थांबले असता, फुलंब्रीकडून भरधाव आलेल्या ट्रकने कारला हुलकावणी देत दुचाकीस्वार सलमान यास उडविले. यावेळी प्रसंगावधान राखून त्याच्या मित्राने बाजूला उडी मारल्याने तो बालंबाल बचावला. यावेळी सलमानला दुचाकीवरून उतरता न आल्याने ट्रकने त्याचा बळी घेतला.
पाच रुपयांसाठी बेदम मारहाण
By admin | Updated: November 8, 2016 01:25 IST