शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; वाहनांचा चुराडा

By admin | Updated: June 27, 2016 01:04 IST

लासूर-स्टेशन : नागपूर-मुंबई महामार्गावरील आरापूर शिवारात सकाळी ६.१५ वाजता झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की,

लासूर-स्टेशन : नागपूर-मुंबई महामार्गावरील आरापूर शिवारात सकाळी ६.१५ वाजता झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती.पोलिसांनी सांगितले की, लासूर स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या आरापूर शिवारात सकाळी ६.१५ वाजता ट्रॅव्हल्स (क्र. एम. एच. 04. जी. ८८५२) मुंबई येथून नागपूर-मुंबई महामार्गाने औरंगाबादकडे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकवर (क्र. सी. जी. ०७.ए. झेड. ७०७९) धडकली. या अपघातात ट्रॅव्हल्स चालक, ट्रक चालकासह एकूण १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी जखमींना उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे नागपूर-मुंबई महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. विशेष म्हणजे या भीषण अपघातातील दोन्ही वाहने बाजूला करण्यासाठी जेसीबी, तसेच पोकलेनला पाचारण करण्यात आले होते. यादरम्यान महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर तब्बल ६ तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही वाहने रस्त्यातून बाजूला करण्यात आली. यानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. यासाठी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अपघातातील जखमीशेख मोहंमद शेख जलालुद्दीन (ट्रॅव्हल्स चालक), जुगरासिंग लखविंदरसिंग (ट्रकचालक), साहेबराव सर्जेराव गंजारे (४०), नानासाहेब राजाराम सोनवणे (४७), लक्ष्मण कचरू दहीहंडे (५५), अश्विन काळे (३०), जलाल नूर शेख (४०), बाबर मुन्शी शेख (३०), गोहर आलम (३०), अश्पाक इस्माईल शेख (२५).बोरदहेगाव : नागपूर-मुंबई महामार्गावरील बेंदवाडी फाट्याजवळ खाजगी बस उलटली; मात्र सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झाली नाही. ही घटना दुपारी १२ वाजता घडली. ही बस उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल २ तास खोळंबली होती. याची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोनि. नांदेडकर, उपनिरीक्षक जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.