शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मकर संक्रांतीचा सण उत्साहात

By admin | Updated: January 16, 2015 01:09 IST

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तीळगुळ देऊन एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तीळगुळ देऊन एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर महिलांनी मंदिरात मनोभावे पूजा केली. शिवाय, एकमेकींना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या. लातूर शहरातील विविध मंदिरांत सकाळी दहा वाजेपासून दर्शनासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. बार्शी रोडवरील हनुमान मंदिर, प्रकाश नगर येथील दत्त मंदिर तसेच लातूर शहरातील बालाजी मंदिर, श्री वैद्यनाथ महादेव मंदिर आदी मंदिरांमध्ये महिलांची दर्शनासाठी गर्दी होती. सुगडे पूजन करून एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. मकर संक्रांतीच्या सणात तिळाचे फार महत्व असून, थंडीच्या दिवसांत तीळ खाल्ल्याने अंगात उष्णता निर्माण होते. तीळ खाल्ल्याने स्निग्धताही येते. स्निग्धता म्हणजे स्नेह व मैत्री असाही अर्थ निघतो. त्यामुळे ‘तीळगुुळ घ्या आणि गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा या सणानिमित्त दिल्या जातात. गुरुवारी दिवसभर तीळगुळ वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. मित्र, मैत्रिणी तसेच आप्तेष्टांना तीळगुळ देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. लातूर शहरासह जिल्ह्यात या सणाचा उत्साह होता. हळदी-कुंकू, फणी, काजळ, शिकेकई आदी वस्तू देऊन महिलांनी मकर संक्रांतीचा सण साजरा केला. बुधवारी लातूर शहरातील बाजारपेठेत या वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठ फुलली होती. मकर संक्रांतीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंचे स्टॉल्स बाजारात होते. (प्रतिनिधी)