शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भांगसीमाता गडावर महोत्सवाची सांगता

By admin | Updated: October 12, 2016 01:15 IST

वाळूज महानगर : शरणापूरच्या ऐतिहासिक भांगसीमाता गडावर नवरात्र महोत्सव व जपानुष्ठान सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली.

वाळूज महानगर : शरणापूरच्या ऐतिहासिक भांगसीमाता गडावर नवरात्र महोत्सव व जपानुष्ठान सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली. या प्रसंगी श्री श्री १००८ स्वामी परमानंदगिरी महाराज यांचे प्रवचन व मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत या महोत्सवात दहा दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडले. १० आॅक्टोबरला सकाळी ५.३० वाजता स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यानंतर लेझीम पथक व डोक्यावर कलश घेतलेल्या महिलांसह भाविकांनी भव्य मिरवणूक काढून मातेचे दर्शन घेतले. या प्रसंगी प्रवचनातून समाजप्रबोधन करताना स्वामी परमानंदगिरी महाराज म्हणाले की, समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संतांचे असून त्यांची शिकवण व विचार आचरणात आणण्याची गरज आहे. जीवनात आई-वडील, साधू-संत व रंजल्या-गांजलेल्याची सेवा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतल्यास समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. निष्काम सेवा व फळाची अपेक्षा न करता कार्य केल्यास आत्मिक समाधान व मनाला शांती मिळते, असेही परमानंद गिरी महाराज यांनी सांगितले. प्रवचनानंतर महाप्रसादाने या धार्मिक महोत्सवाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाठ, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, जि.प.सदस्य अनिल चोरडिया आदींसह औरंगाबाद, जालना, परभणी, नाशिक, नगर, जळगाव, चाळीसगाव आदी भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.