शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत तिसºयांदा भिजली खताची पोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:35 IST

रेल्वेस्टेशन मालधक्क्यावरील खताची पोती दरवर्षी पावसाळ्यात भिजत आहेत. गेल्या चार महिन्यांत तिसºयांदा खताची पोती भिजली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वेस्टेशन मालधक्क्यावरील खताची पोती दरवर्षी पावसाळ्यात भिजत आहेत. गेल्या चार महिन्यांत तिसºयांदा खताची पोती भिजली.मालधक्क्यावर शेडची अपुरी सुविधा आहे. उघड्यावर खत उतरविल्यानंतर त्यांची काळजी घेण्याकडे माल वाहतूकदार दुर्लक्ष करतात. त्यामुळे खत भिजण्याचा फटका शेतकºयांना बसतो.शहरात बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसात मालधक्क्यावर युरिया खताची शेकडो पोती भिजली. दोन मालगाड्यांद्वारे अनुक्रमे २५०० आणि १८०० टन युरियाची पोती मालधक्क्यावर आली होती. पावसाचा अंदाज असूनही पोती ताडपत्रीने झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सायंकाळी पावसाला सुरुवात होताच अनेक पोती पाण्यात भिजली. गुरुवारी सकाळपर्यंत अनेक पोती उघडीच पडून होती. पावसामुळे खतांची झालेली दुरवस्था स्पष्ट दिसत होती. खत भिजल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहे; परंतु रेल्वे प्रशासन आणि माल वाहतूकदार यातून कोणताही धडा घ्यायला तयार नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही.शेड वाढवामालधक्क्यावर आजघडीला केवळ ११ मालडब्यांच्या क्षमतेचे शेड आहे. प्रत्यक्षात ४२ मालडबे येतात. त्यामुळे शेड वाढविण्याची मागणी होत आहे. मालगाडीत माल ठेवल्यास शुल्क द्यावे लागते. रेल्वे आल्यानंतर ९ तासांच्या आत माल उतरवून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक पोत्यासाठी प्रतितास १५० रुपये आकारले जातात. हे शुल्क वाचविण्यासाठी उघड्यावर माल उतरविला जात असल्याचे सांगितले जाते.