शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

भरधाव ट्रकने  ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना उडवले, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 6:42 PM

जालन्याकडून वाळूज एमआयडीसीकडे सुसाट निघालेल्या मालवाहून ट्रकने ट्रिपलसीट मोटारसायकलस्वारांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तीन जखमी झाले.

औरंगाबाद, दि. २१ : जालन्याकडून वाळूज एमआयडीसीकडे सुसाट निघालेल्या मालवाहून ट्रकने ट्रिपलसीट मोटारसायकलस्वारांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तीन जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात दुपारी ३ वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील महनगर चौकाजवळ घडला.

संतोष गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, आणि अनिल बोलकर(सर्व रा. फुलेनगर, उस्मानपुरा)अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैैकी संतोषची प्रकृती चिंताजनक असल्याचे सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले. या अपघाताविषयी ते म्हणाले की, फुलेनगर येथील रहिवासी तिन्ही तरूण मोटारसायकलने क्रमांक(एमएच२०बीए३०५८) महुनगरकडे बीड बायपासने जात होते. यावेळी त्यांच्या मागून देवळाई चौकाकडून आलेल्या मालवाहू ट्रकने(जीजे १० डब्ल्यू ६९३३)त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीसह तिघेही रस्त्यावर जोरात आदळले आणि ट्रकच्या खाली आले.

या अपघातात संतोष गायकवाडच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच बेशुद्ध पडला. तर अन्य दोघेही जखमी झाले. मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊ न जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात त्यांनी दाखल केले.