शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
4
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
5
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
6
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
7
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
8
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
9
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
10
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
11
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
12
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
13
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
14
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
15
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
16
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
17
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
18
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
19
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
20
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन

आरोप-प्रत्यारोपाच्या पोटनिवडणुकीत फैरी

By admin | Updated: June 27, 2014 00:12 IST

लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग १३ अ च्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे़

लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग १३ अ च्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे़ २९ जून रोजी मतदान होणार असल्याने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या काँग्रेससह अन्य अपक्षांनी मतदारांच्या गृहभेटीवर भर दिला आहे़ काँग्रेसचे अ‍ॅड़व्यंकट बेद्रे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने पोटनिवडणूक लागली आहे़ पक्षाची पालिकेत फिफ्टी करण्यासाठी धडपडणाऱ्या काँग्रेसने प्रचारात जोर लावला आहे़नामनिर्देशन पत्र दाखल करताच महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने काँग्रेसची लढत नेमकी कोणासोबत या विषयावर बराच खल झाला़ शेवटी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अपक्ष उमेदवार व्ही़एम़ भोसले यांना महायुतीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले़ प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेससोबत अपक्षांचीच लढत आहे़ सर्वच उमेदवार सकाळी व रात्रीच्या वेळी मतदारांच्या घरी जाऊन आपणच कसे सरस आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत़ महायुती पुरस्कृत उमेदवार विठ्ठल भोसले यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल कांबळे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली असल्याचा आरोप केला आहे़ त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेसंबंधीची माहिती दडविली आहे़ शिवाय, उधारीवर केलेल्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी चालढकल करून दिलेला चेक वटला नसल्याने प्रफुल्ल कांबळे यांना २० जून २००९ साली लातूर प्रथम वर्ग ६ न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षा व दंडही ठोठावला होता़ आजही कर्जप्रकरणी त्यांना नोटिस बजावण्यात आल्याची तक्रार महायुती पुरस्कृत उमेदवार भोसले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे़ बसपाच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात असलेले डॉ़ विजय अजनीकर यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत़ मागील निवडणुकीच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेले अजनीकर यावेळी विजयासाठी प्रयत्न करीत आहेत़ काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी प्रचारात गुंतले आहेत़ शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ समद पटेल, मनपाचे गटनेते नरेंद्र अग्रवाल, बबन देशमुख, बालाजी मुस्कावाड यांच्यासह प्रभागातील स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते मतदारांच्या दारोदारी जाऊन मते मागत आहेत़ (प्रतिनिधी)अजनीकरांना महायुतीचे पाठबळ...बसपाच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार डॉ़ विजय अजनीकर यांना भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष सुधीर धुत्तेकर यांनी मंगळवारी पाठिंबा दिला आहे़ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पूभाई कुलकर्णी यांनी अपक्ष विठ्ठल भोसले यांना महायुती पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले होते़ निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाने डॉ़ विजय अजनीकर यांना पाठिंबा दिल्याने महायुतीतीत दुही चव्हाट्यावर आली आहे़ त्यांच्याकडे मुद्देच नाहीत़़़काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल कांबळे म्हणाले, विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत़ काँग्रेस पक्षाने केलेल्या विकासकामामुळे मतदार त्यांना तारणार नाहीत़ मतदारांचा कौल आमच्या बाजूने असल्याने जाणीवपूर्वक त्यांनी षडयंत्र रचले आहे़ आपणाला करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत़