शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेत मुलींची भरारी

By admin | Updated: May 31, 2017 00:36 IST

लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. लातूर विभागात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.२७ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.३७ टक्के आहे.लातूर विभागातील लातूर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी २० हजार ५७ मुले परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी १७ हजार ५४५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.४८ टक्के असून, १३ हजार ९२३ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी १२ हजार ९८४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. याचे प्रमाण ९३.२६ टक्के आहे. लातूर जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ५.७८ टक्के अधिक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ९ हजार ८१६ मुले परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी ७ हजार ८१५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्याचे प्रमाण ७९.६१ टक्के आहे. तर ७ हजार १४० मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी ६ हजार ४८३ उत्तीर्ण झाल्या आहेत. याचे प्रमाण ९०.८० टक्के आहे. नांदेड जिल्ह्यात १९ हजार ५२४ मुले परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी १६ हजार ७५९ उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.८४ टक्के असून १४ हजार ३० मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी १२ हजार ९५० उत्तीर्ण झाल्या आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.३० टक्के आहे. या तिन्ही जिल्ह्यांत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. हे यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे.