शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

सोनोग्राफीसाठी महिलांची हेळसांड

By admin | Updated: June 13, 2014 00:39 IST

हिंगोली : शहरातील सामान्य रूग्णालयात सोनोग्राफी काढण्यासाठी येणाऱ्या महिलांची हेळसांड थांबलेली नाही.

हिंगोली : शहरातील सामान्य रूग्णालयात सोनोग्राफी काढण्यासाठी येणाऱ्या महिलांची हेळसांड थांबलेली नाही. आधीच आठवड्यात दोन दिवस दिले असताना त्यातही सोनोग्राफी मशिन बंद राहताना दिसते. परिणामी बुधवारी सकाळपासून रांगा लावलेल्या महिलांना सांयकाळी रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. गुरूवारी दुपारपर्यंत डॉक्टर या विभागाकडे फिरकले नसल्याने शकडो महिलांना रांगेत ताटकळत उभा रहावे लागले. सामान्य रूग्णलयातील ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य रूग्णांना बसत आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याची प्रचिती रूग्णांना येत आहे. कधी मशिन्स बंद राहत आहेत तर कधी डॉक्टर रजेवर जात आहेत. रक्ताअभावी आॅपरेशन करता येत नसून काही वेळी आॅपरेशन थिअटर बंद राहत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने सामान्य रूग्णालयात समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे. त्यात वचक राहिला नसल्याने डॉक्टरांचा मनमानी कारभार वाढत चाललेला आहे. बुधवारी त्याची प्रचिती ग्रामीण भागातून आलेल्या महिला रूग्णांना आली. सोनोग्राफीसाठी बुधवारी सकाळपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ८ वाजता दवाखाना उघडताच महिला डॉक्टरांच्या प्रतिक्षेत होत्या; परंतु डॉक्टरांनी राउंड घेतल्यासारखी या विभागात चक्कर मारली. त्यावेळी दुपारून सोनोग्राफी सुरू करणार असल्याचे डॉक्टरांनी काही महिलांना सांगितले. म्हणून सायंकाळपर्यंत महिला रांगेतून हटल्या नव्हत्या. दवाखाना बंद होण्याची वेळ आली तरी डॉ. राजेश पवार रूग्णालयात आले नव्हते. परिणामी सकाळपासून वाट पाहणाऱ्या महिला सायंकाळी रिकाम्या हाती घरी परतल्या. बुधवारप्रमाणे गुरूवारचा दिवसही सारखाच उजाडला. आठवड्यात दोनच दिवस सोनोग्राफी सुरू राहत असल्याने महिलांनी गुरूवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती; पण गुरूवारी देखील डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सुरूवात केली नव्हती. दुपारी २ वाजेपर्यंत महिला रांगेत थांबल्या होत्या. दीड दिवसांपासून सोनोग्राफी प्रतिक्षेत असल्याचे पूनम वाघमारे (पुसेगाव), गीता आवटे (किल्लेवडगाव), विशाखा कांबळे (नांदूर), निशा इंगळे, मनिषा पुंडगे यांनी सांगितले. याबाबत डॉ. राजेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सामान्य रूग्णालयात कंत्राटी सेवेवर कार्यरत आहे. आठवड्यातून दोन दिवस सोनोग्राफी करण्यासाठी रूग्णालयात येतो. बुधवारी मुलीचा निकाल घेण्यासाठी महाविद्यालयात गेलो होते. त्याआधी सकाळी काही महिलांची सोनोग्राफी केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)