शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णालयांच्या कायद्यास वाकुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:46 IST

औरंगाबाद : बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या रुग्णालयांनी नोंदणी करणे अथवा सुरू असलेल्या रुग्णालयांनी दर तीन वर्षांनंतर ...

ठळक मुद्दे‘अब तक ५६’ : बॉम्बे नर्सिंग कायद्याचा भंग; १८० हॉस्पिटल्सना दिले प्रमाणपत्र

औरंगाबाद : बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या रुग्णालयांनी नोंदणी करणे अथवा सुरू असलेल्या रुग्णालयांनी दर तीन वर्षांनंतर पुनर्नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५६ रुग्णालयांनी या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, वैद्यकीय व्यवसायासाठी बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार परवाना देण्यापूर्वी रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग असेल तर त्यासाठी करण्यात आलेल्या पुरेशा सुविधा, आंतररुग्ण विभाग असेल तर तेथे किती खोल्या आहेत, किती खाटा आहेत, यासह अन्य सुविधांबाबतच्या नोंदी जिल्हा परिषदेकडे करणे आवश्यक असते. नर्सिंग होम, सोनोग्राफी, एमआरआय व गर्भपात केंद्रासाठी स्वतंत्र परवाना बंधनकारक आहे. रुग्णालयांना परवाना देताना आरोग्य विभागाने त्या इमारतीत रुग्णांसाठी शुद्ध हवेची सुविधा, अत्यवस्थ रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये पोहोचविण्यासाठी लिफ्ट, स्ट्रेचर, रॅम्पसह सर्वच सुविधांची काटेकोरपणे तपासणी करणे गरजेचे असते. एवढेच नव्हे तर आगीसह विविध प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी अग्निप्रतिबंधक यंत्रणाही रुग्णालयांमध्ये बसविणे अत्यावश्यक असते. मात्र, अनेक ठिकाणी हे सारे नियम धाब्यावर बसविलेले असतात.जिल्ह्यात नव्याने सुरू करण्यात येणाºया रुग्णालयांना परवानगी मिळण्यासाठी जि. प. आरोग्य विभागाकडे २०१५-१६ मध्ये १०९ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये प्रत्यक्ष रुग्णालयांच्या ठिकाणी सुविधा नसल्यामुळे तसेच प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यामुळे तब्बल ९६ प्रस्ताव रद्द करण्यात आले होते. १३ रुग्णालयांना मात्र परवानगी देण्यात आली होती. या माध्यमातून जिल्हा परिषदेला १७ हजार रुपयांचे शुल्क मिळाले होते. २०१६-१७ मध्ये रुग्णालये सुरू करण्यासाठी परवानगीचे २१५ प्रस्ताव प्राप्त झाले. यापैकी ४२ रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. १७३ प्रस्ताव फेटाळण्यात आले. २०१७-१८ मध्ये १३८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी १०६ रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. ३२ प्रस्ताव फेटाळण्यात आले. २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ४३ प्रस्ताव प्राप्त झाले असून, १९ रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. यंदा १ लाख ७८ हजार ५०० रुपये शुल्क मिळाले आहे. अलीकडे चार वर्षांत नवीन रुग्णालय सुरू करण्यासाठी आतापर्यंत ५०५ प्रस्ताव प्राप्त झाले असून, यापैकी १८० रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असून, जिल्हा आरोग्य विभागाला ३ लाख ७४ हजार रुपये शुल्क मिळाले आहे.चौकट .....असुविधांबाबत १ लाख ३० हजारांचा दंडबॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार नव्याने वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी जि. प. आरोग्य विभागाची परवानगी घेणे अथवा परवानगीचे दर तीन वर्षांनी नूतनीकरण करणे बंधनकारक असते. अलीकडे दोन वर्षांत नूतनीकरण न करणारे तसेच असुविधा असणाºया रुग्णालयांपैकी २०१७-१८ मध्ये १० रुग्णालयांना २६ हजार रुपये, तर चालू आर्थिक वर्षात ४६ रुग्णालयांवर १ लाख ३० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर