शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात स्त्री जन्माचे मिरवणूक काढून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 21:03 IST

वाळूज महानगर : समाजात कायम दुय्यम स्थान मिळणाऱ्या स्त्रीचा जन्म होताच तिला गर्भातच संपविण्याच्या अनेक घटना ऐकायला व पहायला मिळत आहेत. पण वडगाव कोल्हाटी येथे एका परिवाराने शुक्रवारी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्त्री जन्माचा आनंदोत्सव साजरा करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

वाळूज महानगर : समाजात कायम दुय्यम स्थान मिळणाऱ्या स्त्रीचा जन्म होताच तिला गर्भातच संपविण्याच्या अनेक घटना ऐकायला व पहायला मिळत आहेत. पण वडगाव कोल्हाटी येथे एका परिवाराने शुक्रवारी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्त्री जन्माचा आनंदोत्सव साजरा करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.भारतीय समाज व्यवस्थेत चूल आणि मुल एवढ्या पुरतेच मर्यादित ठेवून स्त्रीयांना कायम दुय्यम स्थान दिले गेले आहे. पोटी जन्माला आलेल्या मुलीला जिवंतपणीच मारुन टाकणाच्या तसेच स्त्री गर्भ असल्याचे समजताच गर्भातच तिला संपविण्याच्या अनेक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहेत. पण या व्यवस्थेला फाटा देवून वडगाव कोल्हाटी येथील ग्रा.पं. सदस्य अमित चोरडिया यांनी स्त्रीजन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

अमितची पत्नी वैशाली यांनी ९ आॅक्टोबर रोजी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर चोरडिया यांनी समाजातील प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे यासाठी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. पण मुलीच्या जन्मानंतर वैशाली आपल्या माहेरी गेल्या.

वैशाली व मुलीचे शुक्रवारी वडगाव कोल्हाटी येथे आगमन झाले. कन्या व मातेसह आगमन होताच चोरडिया परिवारातर्फे आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता नातेवाईकांसह येथील सिडको उद्यानापासून घरापर्यंत त्यांची ढोल-ताशाच्या गजरात मिरणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. घरी गेल्यानंतर मुलीचे व मातेचे औक्षण करुन त्यांचा गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी चोरडिया परिवारासह नातेवाईक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दरम्यान, समाजात मुलांच्या तुलनेत मुलीला कमी पणाची वागणूक दिली जाते. स्त्री-पुरुष समानतेविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. स्त्री-भ्रूण हत्येमुळे मुलींचा जन्मदर घटला आहे. सर्वांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करावे, असे मुलीचे आजोबा अनिल चोरडिया व आजी ज्योती चोरडिया यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूज