शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रबोधिनीतील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:56 IST

राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटविणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू आणि प्रशिक्षकांचा शनिवारी विभागीय क्रीडा संकुलात सत्कार करण्यात आला. हा सत्कार क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांच्या हस्ते करण्यात आला. क्रीडा मार्गदर्शकांत सुरेंद्र मोदी (अ‍ॅथलेटिक्स), पूनम नवगिरे (अ‍ॅथलेटिक्स), इम्रान शेख (हॉकी) यांचा सत्कार करण्यात आला.

औरंगाबाद : राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटविणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू आणि प्रशिक्षकांचा शनिवारी विभागीय क्रीडा संकुलात सत्कार करण्यात आला. हा सत्कार क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांच्या हस्ते करण्यात आला.क्रीडा मार्गदर्शकांत सुरेंद्र मोदी (अ‍ॅथलेटिक्स), पूनम नवगिरे (अ‍ॅथलेटिक्स), इम्रान शेख (हॉकी) यांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंमध्ये साक्षी चव्हाण, प्रतीक्षा सणस, संदीप पाडवी, पूनम काळेल, संचिता मोरे, सोनाजी पोटे, लक्ष्मण पावरा, वेदांत पिसाळ आणि राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकणाºया हॉकी संघांचा गौरव करण्यात आला. साक्षी चव्हाण हिने राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण व २ रौप्यपदके, तर राज्यस्तरीय स्पर्धेत ३ सुवर्ण, ३ रौप्यपदकांची लूट केली आहे. प्रतीक्षा सणस हिने ‘खेलो इंडिया’मध्ये १ रौप्य, राष्ट्रीय स्पर्धेत एक रौप्यपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे ती मोरक्को येथे होणाºया जागतिक निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. संदीप पाडवी याने राज्यस्तरीय स्पर्धेत एक रौप्यपदक जिंकले आहे. पूनम काळेल हिने राज्यस्तरीय स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्यपदक जिंकले आहे. तसेच राष्ट्रीय गेल इंडिया स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. सोनाजी पोटे याने राज्यस्तरीय स्पर्धेत एक रौप्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. लक्ष्मण पावरा याने राज्यस्तरीय स्पर्धेत २ रौप्यपदके जिंकली आहे. वेदांत पिसाळ याने राज्यस्तरीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले आहे. आज झालेल्या सत्कार सोहळ्यास क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांच्यासह क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, चंद्रकांत मखरे, सुनील वानखेडे, सोनल तायडे, सुरेश मोरे, गौतम कहाळे, हौसाबाई काकडे व सुभाष मुरकुंडे आदींची उपस्थिती होती.