शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
4
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
5
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
9
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
10
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
11
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
12
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
13
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
14
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
15
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
16
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
17
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
18
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
19
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
20
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

अवधूताच्या चरणी रंगला ‘नाथ’रंगी स्वरसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:14 IST

दरवर्षाप्रमाणे यावर्षीही पैठण येथे दत्तजयंती संगीत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाबी थंडीत हा सोहळा सुरांच्या रंगात ‘नाथ’रंगी सुरेख रंगल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : दरवर्षाप्रमाणे यावर्षीही पैठण येथे दत्तजयंती संगीत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाबी थंडीत हा सोहळा सुरांच्या रंगात ‘नाथ’रंगी सुरेख रंगल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले.नाथवंशज व प्रसिद्ध गायक मिलिंदबुवा गोसावी यांनी हा शास्त्रीय संगीताचा व्यासंग दिग्गजांच्या सहवासातून या व्यासपीठापर्यंत जोडला आहे.आर्या माने हिने राग यमन गाऊन महोत्सवास प्रारंभ केला. या महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादचे डॉ. भवान महाजन, तर अध्यक्षस्थानी ह.भ.प. नाथवंशज रावसाहेब महाराज होते. महोत्सवात गायक डॉ. वैशाली देशमुख यांनी राग रागेश्री, भूप व अभंग, तर गायिका आदिती गोसावीने राग हंसध्वनी व ठुमरी, मिलिंदबुवा गोसावी यांनी राग गोरख, कल्याण व दोन अभंग गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तबलावादक संतोष देशमुख, उदय नाईक यांनी उत्कृष्ट साथ देऊन रंगत आणली. गायक राजेश सरकटे यांनीही या सोहळ्यास हजेरी लावून संगीताचा सूर अधिक वाढविला. गौरी गोसावी व ओंकार गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.चंद्रशेखर गोसावी यांनी प्रास्ताविकात या महोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. भवान महाजन यांनी नाथवंशज संगीत परंपरेबद्दल माहिती दिली.रावसाहेब महाराजांनी या संगीत परंपरेची विशेषता सांगितली. या कार्यक्रमासाठी हरिपंडितबुवा गोसावी, पुष्कर महाराज, प्रशांत गोसावी, दीप्ती मंगिराज, किशोर देशमुख आदींनी सहकार्य केले. हा महोत्सव उपस्थित कलाकार व रसिकांना एका अपार आनंदाची अनुभूती देऊन गेला.शास्त्रीय संगीताचा वारसाशास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेले हे नाथ घराणे शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचे वंशज आहेत. त्यांनीच हा महोत्सव सुरू केला. नाथवंशज व गायक मिलिंदबुवा गोसावी यांनी हा महोत्सव उंचीवर नेण्याचा दर्जा या कलाकारांच्या रूपाने राखला आहे. पुढील वर्षी याची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार त्यांनी केला.