शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

By admin | Updated: October 7, 2016 01:32 IST

औरंगाबाद : अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर विनाअनुदानित कृती समितीने नेलेल्या मोर्चात सहभागी शिक्षकांना पोलीस कधीही अटक करू शकतात,

औरंगाबाद : अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर विनाअनुदानित कृती समितीने नेलेल्या मोर्चात सहभागी शिक्षकांना पोलीस कधीही अटक करू शकतात, असे ‘मेसेज’ फिरल्यामुळे आज गुरुवारी शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, अनेक शिक्षकांनी आपले मोबाईल बंद करून भूमिगत होणेच पसंत केले. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिक्षकांनी मोर्चा नेला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. अनेक शिक्षकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. एकीकडे अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची जामिनावर सुटका करण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकांच्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर मोर्चात सहभागी असलेल्या शिक्षकांना शाळेत जाऊन अटक केली जाणार असल्याचे ‘मेसेज’ फिरले. पोलिसांकडे व्हिडिओ शूटिंग असून, त्यात दिसणाऱ्या शिक्षकांची माहिती जमा करून त्यांना अटक केली जाणार आहे, अशा चर्चेला ऊत आला. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, अनेक शिक्षक हे मोबाईल बंद करून भूमिगत झाले. काही जणांनी मोबाईलवर आलेले अनोळखी कॉलही टाळले. एकीकडे पोलिसांकडून अटक करण्याची भीती, तर दुसरीकडे गैरहजर राहिल्यास संस्थाचालकांकडून निलंबित केली जाण्याची भीती, अशी डोक्यावर टांगती तलवार घेऊन शिक्षक वावरत आहेत. दरम्यान, अनेक शिक्षक संघटनांनी लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करून शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नियमानुसार ४८ तास पोलीस कोठडीत असलेल्या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होते. ४आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोर्चेकरी शिक्षकांना मंगळवारी अटक झाली असून, ४८ तासांपेक्षा जास्त कालावधीत ते पोलीस कोठडीत आहे. ४पोलीस विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर शिक्षणाधिकारी हे संस्थाचालकांना संबंधित शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देतील. त्यानंतर अटक असलेल्या शिक्षकांना निलंबनाचा सामना करावा लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.