शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

पशुखाद्य महागले !

By admin | Updated: August 6, 2015 00:08 IST

बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या चार वर्षांपासून पाऊसकाळ कमी झाला आहे. यंदा तर दुष्काळच आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जिल्ह्यावर असून, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरगेल्या चार वर्षांपासून पाऊसकाळ कमी झाला आहे. यंदा तर दुष्काळच आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जिल्ह्यावर असून, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. ज्वारीच्या कडब्याची पेंढी ५० रुपयाला, तर उसाच्या चार वाड्याची पेंढी ३५ रुपयाला विकली जात आहे. त्यामुळे पशुधन जगवावे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा टाकला आहे.लातूर जिल्ह्यात लहान जनावरांची संख्या १ लाख ४४ हजार ९३२ आहे. तर मोठ्या जनावरांची संख्या ४ लाख ५५ हजार २१८ आहे. लहान-मोठे मिळून ६ लाख १५० पशुधन जिल्ह्यात आहे. सर्वसाधारणपणे लहान जनावरांना प्रतिदिन तीन किलो तर मोठ्या जनावरांना ६ किलो पशुखाद्य ग्राह्य धरले तर दिवसाला एकूण ३ हजार १६६ किलो खाद्य लागते. परंतु, पशुसंवर्धन विभागाकडे आणि शेतकऱ्यांकडे पशुखाद्यच उपलब्ध नाही. त्यामुळे शेजारच्या कर्नाटक राज्यातून आणि नांदेड जिल्ह्यातून वैरण मागविली जात आहे. जिल्ह्यात खाद्य उपलब्ध नसल्याने चढ्या दराने खाद्य उपलब्ध करावे लागत आहे. त्यातच जिल्ह्यात एकही चारा छावणी उभा राहिली नाही. पशुसंवर्धन विभागाने सहकारी संस्थांना चारा छावण्या उभा करण्यासाठी आवाहन केले. मात्र या आवाहनाला अद्याप तरी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. ज्वारीची एक पेंढी ५० रुपयाला, हायब्रीडची २५ रुपयाला, उसाच्या वाड्याची पेंढी ३५ रुपयाला तर हिरव्या मक्याची ४५ रुपयाला पेंढी आहे.जिल्ह्यातील ६ लाख १५० पशुधन जगवायचे असेल, तर ३ कोटी २ लाख रुपये खर्च पशुपालकांना येतो. एक किलोची पेंढ ७५ रुपयाला तर शेकडा कडब्याची पेंढी ५ हजार रुपयाला सध्या खरेदी करावी लागत आहे. या चाऱ्याचा ढोबळ हिशेब लावला तर महिन्याला ३ कोटी २ लाख रुपयांच्या पुढे पशुधन जगविण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यातच चारा छावण्या नाहीत. शासन व प्रशासनाची मदत नाही. त्यामुळे पशुपालकांसमोर मोठ्या अडचणी आल्या आहेत.शेकड्याचा भाव ठरवून वैरण खरेदी केली जात असे. परंतु, आता मोठ्या प्रमाणात वैरणच उपलब्ध नाही. त्यामुळे दहा-पाच कडब्याच्या पेंढ्या खरेदी केल्या जातात. ज्वारीची एक पेंढी ५० रुपये या भावाने मुश्किलीने दहा-पाच पेंढ्या मिळत आहेत.पशुधनाला जगविण्यासाठी दर दिवसाला ३१६६ किलो खाद्य लागते. महिन्याचा विचार केला तर ९४ हजार ९८३ किलो खाद्याची गरज आहे. लातूर तालुक्यासाठी १३ हजार ४४९, औसा १५ हजार २६४, निलंगा १५ हजार १३८, उदगीर ९ हजार ७६७, अहमदपूर १० हजार ९७२, रेणापूर ७ हजार ४९८, चाकूर ९ हजार १४१, शिरूर अनंतपाळ ४ हजार २५९, देवणी ४ हजार २३३, जळकोट ५ हजार २६१ असे एकूण ९४ हजार ९८३ किलो खाद्य दरमहिन्याला लागते. तर वर्षाला ११ लाख ३९ हजार ७७९ किलो खाद्य या पशुधनाला लागणार आहे. परंतु, जिल्ह्यात कोठेही चारा उपलब्ध नाही.