शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेती वाटून देत नसल्याच्या कारणावरून वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:31 IST

शेती वाटून देत नसल्याने पोटच्या मुलाने व सुनेने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे मंगळवारी दुपारी उघडकीस आली. यानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

पिशोर : शेती वाटून देत नसल्याने पोटच्या मुलाने व सुनेने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे मंगळवारी दुपारी उघडकीस आली. यानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे एका वृद्धास ठार मारून घरात टाकून दिल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सपोनि. अभिजित मोरे, उपनिरीक्षक जयराज भटकर, जमादार संजय देवरे, संजय आटोळे, पोना. सतीश देवकर, पो.कॉ. देशमुख यांनी निंभोरा येथे घटनास्थळी आडवळ शिवारातील गट नं. २६९ येथे जाऊन पाहिले असता कारभारी सांडू सोनवणे (६५) यांचा मृतदेह आढळून आला. मयत कारभारी यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसून येत असल्याने पोलिसांना संशय आला. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कारभारी सोनवणे यांचा मुलगा हरी व त्याची पत्नी सुनीता हरी सोनवणे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर वेळोवेळी मागणी करूनसुद्धा वडील जमीन वाटून देत नसल्याने राग होता. सोमवारी शेतातील घरी रात्री वडिलांशी वाद झाला. यात बांबूच्या काठीने मारहाण केली. या मारहाणीत कारभारी सोनवणे यांचा मृत्यू झाला.पत्र्याच्या खोलीत मृतदेह फेकून पलायनसासºयाचा मृत्यू झाल्याचे सुनेच्या लक्षात येताच कारभारी सोनवणे यांना पत्र्याच्या खोलीत टाकून पतीसह गावाकडे पलायन केले. यावरून हरी कारभारी सोनवणे व सुनीता हरी सोनवणे यांच्याविरुद्ध सपोनि. अभिजित मोरे यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कारभारी सोनवणे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. पोटच्या मुलाने व सुनेने मिळून हे कृत्य केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.