शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जेवताना कायम रडते म्हणून बापानेच केला मुलीचा आपटून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:04 IST

गंगापूर : जेवताना कायम रडते म्हणून दीड वर्षीय सावत्र मुलीला विधिसंघर्षग्रस्त पित्याने जमीनीवर आपटून क्रुरपणे खून केला. ही धक्कादायक ...

गंगापूर : जेवताना कायम रडते म्हणून दीड वर्षीय सावत्र मुलीला विधिसंघर्षग्रस्त पित्याने जमीनीवर आपटून क्रुरपणे खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी (१९) रात्री भेंडाळा शिवारातील अंतापुरात घडली. यानंतर मयत मुलीच्या आईने रागाच्या भरात दिराच्या दोन वर्षीय चिमुकलीला घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे गंगापूर तालुका हादरला आहे.

पहिल्या पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या अश्विनी करण भोसले (२०) यांनी आपल्या दीड वर्षाच्या सवसंया या मुलीसह दोन महिन्यांपूर्वी अंतापुरात येथील १४ वर्षीय विधिसंघर्षग्रस्तासोबत विवाह केला होता. दीड वर्षाची सवसंया ही जेवताना नेहमी रडते म्हणून चीड आल्याने सावत्र बापाने बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सवसंयाला उचलून घराबाहेर नेऊन जोराने जमिनीवर आपटले. यात त्या कोवळ्या जीवाचा जागीच मृत्यू होऊन कायमस्वरुपी आवाज बंद झाला. यानंतर विधिसंघर्षग्रस्ताने कोणाला काही कळू नये, म्हणून चिमुकलीचा मृतदेह जमिनीत पुरला.

घरच्यांनी मुलीबद्दल त्या विधिसंघर्ष पित्याला विचारले असता त्याने काहीही माहिती दिली नाही. यावरुन त्याच्या आई-वडिलांनी त्यास कोंडून मारहाण करीत विचारपूस केली. त्यानंतर त्याने घडलेली घटना सांगितली. तेव्हा मयत मुलीची आई अश्विनीने घटना ऐकून टाहो फोडला. यानंतर रागाच्या भरात तिने दिराच्या दोन वर्षीय रिया रावण भोसले या मुलीला घेऊन पलायन केले. घडलेल्या या सर्व प्रकाराची माहिती विधीसंघर्षग्रस्ताच्या आईने गंगापूर पोलिसांना गुरुवारी दिली. पोलिसांनी सावत्र मुलीचा खून करणाऱ्या विधिसंघर्षग्रस्तास ताब्यात घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला व मुलीचे शवविच्छेदन केले. विधीसंघर्षग्रस्त पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक औटे, गुप्त वार्ता शाखेचे योगेश हरणे, स्वाती गायकवाड, निंबोरकर, शेख भिल्ल करीत आहेत.

चौकट

निष्पाप रिया अडकली

नवऱ्याने आपल्या मुलीचा खून केल्याची घटना कानी आल्यावर तिची आई अश्विनीने आपल्या दिराच्या दोन वर्षीय रिया या मुलीला घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. यात त्या निष्पाप रियाचा काहीही दोष नसताना विनाकारण तिला धारेवर धरले गेले आहे. रियाचे आई-वडील, आजी-आजोबांचा जीव यामुळे कासावीस झाला असून, आमची मुलगी शोधून आणा, अशी आर्त विनवणी त्यांनी गंगापूर पोलिसांकडे केली आहे. रागाच्या भरात अश्विनी त्या चिमुकलीसोबत काही बरेवाईट करेल, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिचा कसून शोध सुरु आहे.

फोटो :