शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

ट्रक-बसचा भीषण अपघात

By admin | Updated: April 10, 2015 00:27 IST

येणेगूर / उमरगा : भरधाव वेगातील ट्रकने बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला प्रवाशांचा उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला़

येणेगूर / उमरगा : भरधाव वेगातील ट्रकने बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला प्रवाशांचा उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला़ तर ३४ प्रवाशी जखमी झाले असून, त्यांच्यावर येणेगूर व उमरगा येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ हा अपघात गुरूवारी सायंकाळी पुणे - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील भोसगा (ता़उमरगा) साठवण तलावाजवळ घडला़मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या मालट्रकने (क्ऱएम़एच़२५- बी़९८११) हैद्राबादहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला (क्ऱएम़एच़४०- एम़९१९७) गुरूवारी सायंकाळी भोसगा (ता़उमरगा) साठवण तलावाजवळ विरूध्द दिशेने घुसून जोराची धडक दिली़ अपघातानंतर परिसरातील शेतकरी, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून पोलिसांना माहिती दिली़ घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलीस ठाण्याचे सपोनि विलास गोबाडे, पोउपनि आऱए़मोमीन, पोहेकॉ गोरोबा कदम, अनिल जोशी, नामदेव जाधव, मनोज जगताप, कैलास चाफेकर, किरण औताडे, राजेंद्र बारकूल यांच्यासह येणेगूरचे उपसरपंच सागर उटगे, सुरेश मगरे, शिवदर्शन पाटील, युनूस देशमुख, गोविंद क्षीरसागर आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमी प्रवाशांना बसच्या बाहेर काढले़ किरकोळ जखमींना येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमींना उमरगा येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले़ या अपघातात शीला जगन्नाथ झाकडे (वय-४० रा़ कुन्हाळी ता़उमरगा) या महिलेचा मृत्यू झाला़ तर दुसऱ्या मयत महिलेची ओळख पटू शकली नाही़ अपघातात इतर ३४ प्रवाशी जखमी झाले़ जखमींमधील हरिश्चंद्र किसन भोसले, भागिरथी हरिश्चंद्र भोसले (दोघे रा़ उस्मानाबाद), दत्तूसिंग मदनसिंग धारूरकर (नळदुर्ग), सुरेश हिरवे (उमरगा), राशीद शेख (नळदुर्ग), सिद्राम विरपक्ष स्वामी (लोहारा), कुरूम कोटेसाहेब (हैद्राबाद), मर्दाना रशीद शेख (पुणे), फैयाज शेख (नळदुर्ग), अस्मान शेख (नळदुर्ग), व्यंकट बाबूराव माने (नाईचाकूर), शारदा हणमंत लोहार (चिवरी), वसंत दादाराव माने (माडज) यांच्यावर येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले़ तर लियाकत शेख (वय-३८ रा़नळदुर्ग), मदीना रशीद शेख (वय- ४० रा़पुणे), इब्राहीम मुस्तफा शेख (वय- १० नळदुर्ग), नागरबाई अंबादास कदम (वय-६० ऱा़धारूर), राशदबी दस्तगीर शेख (वय- ६० पुणे), मिठालाल पृथ्वीराज जैन (वय- ६५ रा़सुरत), या जखमींवर उमरगा येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले़ तर बसचा चालक पी़जी़घोडके (वय-३८ खानापूर), वाहक रवींद्र अप्पासाहेब चेंडके (वय-२८ रा़ सोलापूर), सचिन आप्पाराव कलकेरी (३५ रा़संगळगी आळंद), रामचंद्र धोंडीबा हाके (वय-५० रा़सोलापूर), सुमेध अशोक वाघमारे (वय-२८ सास्तूर), विद्युलता दत्तात्रय महामुनी (वय-५१ रा़सोलापूर), सुरेखा पांडुरंग राऊत (वय-४२ रा़तुगाव), विक्रम जगन्नाथ झाकडे (वय-२५ रा़नेलवाड),संगिता राजपालसिंह बायस (५० रा़ पाथ्री), राजपालसिंह बायस (वय- ६२ पाथ्री), सुरेखा शहाजी राठोड (वय- २७ खेड), शंकर तात्याराव डोंगरे (वय-३२ किणी), कुडूसाब काडलेसाब कारचे (वय-५० ऱा़उमरगा), प्रभावती गोरखनाथ सूर्यवंशी (वय-६५ रा़नेलवाड), पार्वती राम मालीगोने (वय-४५ राक़ार्ला) या पंधरा जणांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले आहे़ अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (वार्ताहर)अपघातानंतर जेवळी, आष्टाकासार व येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना व शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख शिवराज चिनगुंडे व इतर नागरिकांनी माहिती देवून रूग्णवाहिकांना मागविली होती़ मात्र, एकही रूग्णवाहिका वेळेत अपघातस्थळी दाखल झाली नाही़ अर्ध्या तासानंतर रूग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाल्या़ त्यानंतर जखमींना उमरगा येथे नेण्यात आले़ मात्र, रूग्णवाहिका वेळेत घटनास्थळी आल्या असत्या तर दोन महिलांचेही प्राण वाचले असते, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती़ तर जेवळी येथील रूग्ण वाहिका अपघातस्थळी पोहोचलीच नाही़