बीड: धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील जि. प. मा. शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक व शिपाई यांची तात्काळ बदली करून दुसरे मुख्याध्यापकांची नेमणूक करावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोगलवाडी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की, सध्या भोगलवाडी येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक शामसुंदर चाटे हे व त्यांचे सहशिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवत नाहीत. विशेष म्हणजे यातील काही शिक्षक गावातीलच असल्याने गावातल्या राजकारणात ढवळाढवळ करत आहेत. यामुळे गावातील वातावरण खराब होत आहे. अनेकवेळा तर वेळेवर शाळेत प्रार्थना देखील घेत नाहीत. याबाबत अनेकवेळा शिक्षण विभागाला सांगून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. भोगलवाडी येथील रामप्रभू मुंडे, रामकिसन तिडके, दामोदर मुंडे, शेषेराव तिडके, विठ्ठल मुंडे, भागवत इंगोले आदींनी उपोषणात सहभाग नोंदवला होता.(प्रतिनिधी)आरोप बिनबुडाचेभोगलवाडी येथील शाळेस व येथील मुख्याध्यापक, शिक्षकांना गावातील काही लोक पूर्ववैमनस्यातून वेठीस धरीत आहेत. खोट्या तक्रारी देऊन शिक्षकांच्या बदलीची मागणी करीत आहेत. यामुळे भोगलवाडी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मोठे नुकसान होत आहे, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव अर्जुन तिडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी उपोषण
By admin | Updated: July 17, 2014 00:59 IST