औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक क्षेत्रातील आयआयएम ही शिखर संस्था औरंगाबादेत यावी या प्रमुख मागणीसाठी आज औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक संस्थांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावून पाठिंबा दर्शविला; मात्र भाजपाचे पदाधिकारी या उपोषणाकडे फिरकलेच नाहीत. आज सकाळी १० वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी विविध संस्था, संघटनांच्या मंडळींनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. ‘आयआयएम आमच्या हक्काचे’, ‘मुख्यमंत्री हाय हाय...’ आदी घोषणा यावेळी प्रामुख्याने देण्यात आल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आयआयएम’ ही संस्था नागपुरात सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यात असंतोष पसरला आहे.
आयआयएमसाठी उपोषण सुरू; भाजपाची पाठ!
By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST