शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थपुरी ग्रा.पं.ने गाळ्यांचा लिलाव न केल्याने उपोषण

By admin | Updated: May 12, 2017 00:29 IST

तीर्थपुरी : येथील व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असतानाही त्या गाळ्यांचा लिलाव केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ग्रा.पं. समोर ११ मे रोजी उपोषण सुरू केले

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : येथील व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असतानाही त्या गाळ्यांचा लिलाव केला नाही. त्यामुळे तीर्थपुरी येथे गावातील कार्यकर्त्यांनी ग्रा.पं. समोर ११ मे रोजी उपोषण सुरू केले असून, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.तीर्थपुरी येथील ग्रामपंचायतच्या ग्राम सचिवालयातील नवीन बांधलेले दोन व्यापारी गाळे तसेच इतर १९ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपली असताना त्या सर्वच गाळ्यांचे लिलाव केले जाईल, असा ठराव घेण्यात आला होता. परंतु लिलाव न करता नवीन दोन गाळे ग्रामसचिवालयात इतरांना देण्यात आले असून, व्यापारी संकुलातील १९ गाळ्यांची मुदत संपली तरी त्याचाही लिलाव घेण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला लेखी तसेच पं.स.ला लेखी तक्रार केली. परंतु त्याकडे ग्रामविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे लिलावाचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असे उपोषणकर्ते श्रीहरी बोबडे, अण्णासाहेब बोबडे, गणेश गवते, दिलीप मोरे, विठ्ठल बोबडे, तुकाराम बोबडे, राहुल चिमणे यांनी सांगितले. यावेळी सरपंच शैलेंद्र पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जे गावे वाटप केले ते नियमानुसार वाटप केले असून, त्यात कोणतीही मनमानी केलेली नाही. ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केले असता ते आलेले नव्हते. तसेच त्यांचा मोबाईल स्वीचआॅफ होता. उपोषणस्थळी पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, रोहयो अध्यक्ष अंकुश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य घनशाम चिमणे यांनी भेटी देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.