परभणी : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशनच्या वतीने वीज कामगारांनी कंपनीच्या कार्यालयासमोर ७ जुलैपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.प्र.विभाग अंतर्गत कार्यरत वेतन गट ३ व ४ मधील वीज कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्यायकारक पद्धतीने केल्या आहेत. तसेच मुख्य कार्यालयाने जारी केलेल्या सूचनांचाही भंग बदल्या करताना करण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी आंदोलनास प्रारंभ केला आहे. गुरुवारी किशोर गायकवाड, सुरेश लुटे, किशन दुधारे, नखत यांनी उपोषण केले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वीज कामगारांचे उपोषण
By admin | Updated: July 7, 2016 23:37 IST