शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे थकित पैसे मिळणार

By admin | Updated: August 9, 2014 00:35 IST

उस्मानाबाद : आधारभूत हमीभाव केंद्रावर धान्य दिलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. सदर रक्कम नाफेडने पर्यायाने केंद्र शासनाने उपलब्ध करुन द्यायची होती.

उस्मानाबाद : आधारभूत हमीभाव केंद्रावर धान्य दिलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. सदर रक्कम नाफेडने पर्यायाने केंद्र शासनाने उपलब्ध करुन द्यायची होती. मात्र केंद्राकडून पैसा न आल्याने अखेर शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळणार आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मार्केटींग फेडरेशनमार्फत नाफेडला तूर ३०, ४४१.५० क्विंटल, हरभरा ७५.२८९ क्विंटल दिला होता. त्याची देय रक्कम ३६ कोटी ४२ लाख ९४ हजार ३५० रुपये एवढी होती. त्यातील २५ कोटी ३३ लाख ६३ हजार ३४६ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र ११ कोटी ९ लाख ३७ हजार रुपये अद्यापही थकीत होते. शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी नाफेडकडून शेतमालाची रक्कम उपलब्ध होत नसल्याने महाराष्ट्र शासनाने याबाबत पुढाकार घेण्याची विनंती राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. या अनुषंगाने ८ आॅगस्ट रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. थकीत पैसे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभा करावयाच्या ५० कोटीच्या कर्जास शासन हमी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार उपलब्ध झालेल्या हमीचा वापर करुन ५० कोटीचे कर्ज उभे करण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट को आॅप. फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत पैसे तातडीने अदा करण्याची मागणी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी संपर्कमंत्री दिलीप सोपल यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)