शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्य सरकार बेफिकिर

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.परतूर येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या बैलगाडीसह मोर्चास ते संबोधित करत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने परतूर विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासाठी बैलगाडीसह शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बबनराव लोणीकर, भाजयूमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे, विजयराव गव्हाणे, जि. प. चे उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भाऊसाहेब कदम, हरीराम माने, सतीश जाधव हे प्रमुख उपस्थित होते. तावडे पुढे म्हणाले की, राज्यात दुष्काळी परीस्थिती असताना राज्य सरकारला याचे सोयरसुतक नाही, सरकारजवळ दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलीही ठोस योजना नाही. गारपीट झाली, पिके हातची गेली, जे पिकवलं ते उगवलंच नाही. या राज्य सरकारने महाराष्ट्रावर तीन लाख कोटीचे कर्ज करून ठेवले. फुले, शाहू,आंबेडकर यांचा महाराष्टृ या सरकारने विक्रीला काढला आहे. राज्याची स्थिती वाईट आहे. राज्यात आमचे भाजपा सेना युतीचे सरकार आले तर सर्व आरक्षणाचे प्रश्न सोडवून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांना जेल दाखवू असा इशाराही तावडे यांनी यावेळी दिला. यावेळी आपल्या प्रास्ताविकात माजी आ. लोणीकर यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर खरमरीत टीका करून मतदारसंघातील प्रश्न मांडले. यावेळी जि. प. सदस्य शहाजी राक्षे, भगवानराव मोरे, बालाजी सांगूळे, मेहराज खतिब, प्रशांत बोनगे, उमाकांत मानवतकर, सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.