शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांच्या अनुदान कपातीची ‘मेख’ !

By admin | Updated: March 2, 2016 23:09 IST

राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या अभिनव योजनेचा सध्या गवगवा आहे. मात्र, अनुदान कपातीची मेख शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. पूर्वी शेततळ्यांसाठी ८२ हजार रूपये अनुदान होते.

राजेश खराडे , बीडमागेल त्याला शेततळे या अभिनव योजनेचा सध्या गवगवा आहे. मात्र, अनुदान कपातीची मेख शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. पूर्वी शेततळ्यांसाठी ८२ हजार रूपये अनुदान होते. ते आता ५० हजार रूपयांपर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाने पिचलेला शेतकरी अनुदान कपातीमुळे अडचणीत आला आहे.शेतकऱ्यांची संख्या ७ लाखांवर आहे. त्या तुलनेत २४०० शेततळी उभारण्याचे उद्दिष्ट कृषी विभागासमोर आहे. आकडेवारीच्या दृष्टीने ही संख्या कमी असली तरी ज्या कासवगतीने योजनेला सुरवात झाली आहे त्यानुसार कृषी विभागाचे कसब पणाला लागणार आहे. शेतळ्याकरिता ५० हजाराचे तुटपुंजे अनुदान तेही वेगवेगळ्या टप्प्यात लाभार्थ्यांना मिळणार आहे. शिवाय प्लॅस्टिक कव्हरसाठीचा खर्च हा वेगळाच. सद्यस्थितीला शेतकऱ्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. यात लाखो रूपये खर्चून शेततळे उभारण्याची शेतकऱ्यांची मानसिकताच नाही. यातच कृषी अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे सध्या तरी बीड तालुका वगळता इतरत्र शेततळ्यांसाठी असलेली आॅनलाईन प्रक्रिया आॅफलाईन असल्याची स्थिती आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. या कालावधीत बोटावर मोजण्याइतकेच प्रस्ताव कृषी कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. त्यातूनच हार्डकॉपींची छानणी होणार आहे.यापूर्वीही जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात आली होती. मात्र, याला अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी केवळ अनुदान लाटण्यासाठी योजनेत सहभाग नोंदविला होता. आजघडीला याच शेततळ्यांचे डबके झाले आहे.