शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची मदार परप्रांतीय मजुरांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:04 IST

गारज : शिवारातील नव्वद टक्के शेतकरी परप्रांतीय मजुरांवर अवलंबून आहेत. अल्पभूधारकांपासून ते बडे शेतकरी शेती कामासाठी मध्यप्रदेशवारी करून अलिशान ...

गारज : शिवारातील नव्वद टक्के शेतकरी परप्रांतीय मजुरांवर अवलंबून आहेत. अल्पभूधारकांपासून ते बडे शेतकरी शेती कामासाठी मध्यप्रदेशवारी करून अलिशान वाहनांमध्ये मजूर आणण्यासाठी चढाओढ करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.

गारज परिसरातील मणुर, बाभूळगाव, शिवगाव पाथ्री, पोखरी, भोकरगाव, बायगाव, झोलेगाव, भटाना, साकेगाव, मनेगाव, जांबरखेडा या गावातील लहान शेतकऱ्यांपासून ते सर्वाधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांकडे शेतकाम करण्यासाठी परप्रांतीय मजूर आहेत. त्यामुळ‌े शेतकऱ्यांच्या शेतीकामाची मदार परप्रांतीय मजुरावर आहे. मजुरांना राहण्यासाठी शेतशिवारात पत्र्याचे शेड, खाण्यासाठी गहू, तांदूळ, पिण्यासाठी पाण्याची सुविधा पुरविली जात आहे. त्याचबरोबर मजुरांना उचल पैसेदेखील दिले जात आहेत.

-----

स्थानिक मजुरांचा दर जास्त

शेतकरी परप्रांतीय मजुरावर अवलंबून असल्याने जर मजूर अर्ध्यावर निघून गेले, तर शेतकऱ्यांची डोळे असून आंधळे झाल्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे या मजुरांना व त्यांच्या कुटुंबीयांना वर्षभर सांभाळण्याची तयारी या शिवारातील शेतकरी घेतात. असे शेतकरी भीमराज सरोवर, रामेश्वर चव्हाण, रामेश्वर सरोवर, दिगंबर मोरे यांनी सांगितले. आपल्याकडील स्थानिक मजूर चांगले काम करीत नाहीत, तसेच स्थानिक मजुरांचा रोजंदारीचा दरदेखील जास्त असतो. त्यामुळे परप्रांतीय मजुरांना पसंती दिली जात आहे.