शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी केली संकटावर मात

By admin | Updated: December 11, 2014 00:42 IST

माधव शिंदे, मसलगा यंदाच्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी धास्तावला असतानाही मसलगा येथील पाच शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने संकटावर मात करणार

माधव शिंदे, मसलगायंदाच्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी धास्तावला असतानाही मसलगा येथील पाच शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने संकटावर मात करणार असा निर्धार करीत अत्यल्प पाण्यावर अत्याधुनिक पद्धतीने मलचिंग पेपरवरील मिरची लागवड करुन नैराश्यात जगणाऱ्या शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्नच सुरु केला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांत चर्चा सुरु आहे़निलंगा तालुक्यातील मसलगा येथील तुळशीदास साळुंके, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर आरेराव, गोविंद जाधव, बापूराव जाधव आदी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी एक एकर याप्रमाणे पाच एकर शेतीवर मिरची लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केली आहे़ जमिनीपासून १ फूट उंचीचे बेड तयार करुन त्यावर प्रथम ठिबक अंथरले़ त्यावर मलचिंग पेपरचे अच्छादन केले़ दीड बाय दीड फुट असे अंतर ठेऊन मिरचीची लागवड केली आहे़ एका एकरसाठी ४ हजार रोपे लागली आहेत़ आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केल्याने उत्पन्न चांगले मिळेल अशी आशा आहे़ अल्प पावसामुळे यंदा हातचे खरीप गेले़ रबीची पेरणी झाली़ परंतु, ती उगवत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ परिणामी, चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ दुष्काळी परिस्थितीत होरपळ होत असल्याने काही शेतकरी आत्महत्येसारख्या मार्गाकडे वळत आहेत़ परंतु, शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा़ शेतातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करुन उत्पादन घ्यावे, असा संदेशच या शेतकऱ्यांनी दिला आहे़ सध्या सगळीकडेच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या या नवीन प्रयोगाने अन्य शेतकऱ्यांनाही उत्साह येणार आहे़ या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक डी़ एल़ कळसे हे मार्गदर्शन करीत आहेत़ ४माझ्याकडे पाच एकर ऊस आहे़ त्यातील एक एकर ऊस मोडून आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली आहे़ उर्वरित ऊस क्षेत्रही मोडित काढून अल्प पजर्न्यावरची पीके घेणार असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर आरेराव यांनी सांगितले़४कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन मिळविणे व कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने आपणही मिरचीची लागवड केली असल्याचे शेतकरी बापूराव जाधव यांनी सांगितले़४माझे शेतशेजारी ज्ञानेश्वर आरेराव यांनी पाणी देऊ केल्याने आपल्याकडे असलेला ऊस मोडित काढून मिरची व टोमॅटो लागवड करीत असल्याचे सचिन आरेराव यांनी सांगितले़ ४गेल्या दोन - तीन वर्षांपासून आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले असून, यामध्ये कलकत्ता पान, केळी, टोमॅटो, टरबूज आदींचे उत्पन्न घेतल्याचे शेतकरी तुळशीदास साळूंके म्हणाले़