शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: April 4, 2017 23:20 IST

परंडा : धरणाचे पाणी तात्काळ कालव्यात सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी सीना-कोळेगाव विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

परंडा : सीना-कोळेगाव धरणावर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्याचा आरोप करीत धरणाचे पाणी तात्काळ कालव्यात सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी सीना-कोळेगाव विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू असून पाण्याची पातळी खालावत आहे. याचा सर्वाधिक फटका उन्हाळी हंगामातील पिकांना बसणार असल्याने विधान परिषदेचे आ. प्रा. तानाजी सावंत यांनी सीना-कोळगाव धरणावर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याबाबत विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित विभागाकडून योजना तात्काळ सुरु करण्याचे आश्वासन दण्यात आले. मात्र, योजना सुरु करण्याबाबत कुठल्याही हालचाली होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सीना-कोळेगाव धरणातील पाणी कालव्यातून सोडण्यासोबतच कॅनलमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्याची मागणीही करण्यात आली. या आंदोलनामध्ये संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवानंद तळेकर, शंकर घोगरे, भूम तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, भाऊसाहेब मुंडे, दिलीप मोरजकर, अप्पा महानवर, मनसे तालुकाध्यक्ष नानासाहेब पडघन, निखील महानवर, बबन रधवे, सारंग घोगरे, जयराम कदम, आकाश साणवने, शब्बीर पटेल, लक्ष्मण घोगरे, अक्षय तिंबोळे, अक्षय रधवे, ब्रम्हदेव तिंबोळे, सह कंडारी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होतो. धरणे आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी या आंदोलनाबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना दिली होती. तरीही कार्यकारी अभियंता या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आंदोलकांमधून संताप व्यक्त होत होता. (वार्ताहर)