शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांची थट्टा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:46 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलैची मुदत संपल्यानंतर शासनाने मंगळवारी सायंकाळी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीचे आदेश बँकांना पाठविले़, परंतु रात्री उशिरा पीक विम्यासंदर्भात आणखी एक आदेश धडकला़ त्यामध्ये बिगर कर्जदार शेतकºयांना सेतू केंद्रात पीक विमा काढण्याचे नमूद होते़ त्यामुळे बुधवारीही बँकांनी पीक विमा स्वीकारला नसून बँक आणि सेतूच्या फेºयात अडकलेल्या शेतकºयांची अशाप्रकारे शासनाकडून थट्टाच सुरु आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलैची मुदत संपल्यानंतर शासनाने मंगळवारी सायंकाळी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीचे आदेश बँकांना पाठविले़, परंतु रात्री उशिरा पीक विम्यासंदर्भात आणखी एक आदेश धडकला़ त्यामध्ये बिगर कर्जदार शेतकºयांना सेतू केंद्रात पीक विमा काढण्याचे नमूद होते़ त्यामुळे बुधवारीही बँकांनी पीक विमा स्वीकारला नसून बँक आणि सेतूच्या फेºयात अडकलेल्या शेतकºयांची अशाप्रकारे शासनाकडून थट्टाच सुरु आहे़३१ जुलै ही पीक विमा स्वीकारण्याची अंतिम तारीख असल्यामुळे जिल्ह्यातील सेतू केंद्र आणि बँकांबाहेर हजारो शेतकºयांनी उन्हातान्हात रांगेत लागून पीक विमा भरला़ अनेक तालुक्यांतील शेतकºयांना तर पीक विम्यासाठी जागरण करावे लागले़ नागपंचमी सणाच्या दिवशीही शेतकरी दिवसभर बँकांच्याच रांगेत होते़ ३१ जुलैच्या रात्रीपर्यंत जिल्ह्यात जवळपास चार लाख शेतकºयांनी पीक विमा भरला होता़ मुदत संपल्यामुळे तब्बल ३ लाख ७० हजारांवर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यात ३१ जुलैच्या रात्री शासनाने पीक विम्यासाठी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली़ त्यामुळे अनेक शेतकºयांचा जीव भांड्यात पडला होता़ शासनाच्या घोषणेनुसार १ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात बँकांमध्ये पीक विमा काढण्यासाठी शेतकरी गेले, परंतु सायंकाळपर्यंत मुदतवाढीचे आदेशच बँकांना मिळाले नव्हते़ त्यामुळे काही ठिकाणी बँकेचे अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादाच्या घटना घडल्या़सायंकाळी बँका बंद झाल्यानंतर मुदतवाढीचे आदेश धडकले़ त्यामुळे मुदतवाढीच्या पहिल्या दिवशी एकाही शेतकºयाचा पीक विमा उतरविण्यात आला नाही़ सायंकाळी आलेल्या आदेशानंतर बँकांनी बुधवारपासून पीक विमा काढण्याचे नियोजन केले होते, परंतु रात्री उशिरा आणखी एक नवाच आदेश धडकला़ त्यामध्ये ही मुदतवाढ केवळ बिगर कर्जदार शेतकºयांसाठीच देण्यात आली असून आॅनलाईन पद्धतीत जनसुविधा केंद्राच्या माध्यमातूनच भरण्यात येतील़शेतकºयाकडील पीक पेरणी प्रमाणपत्र ३१ जुलै २०१७ अथवा त्यापूर्वीचा असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले़ तसेच वाढीव मुदतीत भरलेल्या अर्जाची माहिती स्वतंत्रपणे ठेवण्यास सांगण्यात आले आहे़ तसेच यापूर्वी दिलेल्या आदेशात ५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती़ नव्या आदेशात मात्र ती ४ आॅगस्टपर्यंतच दाखविण्यात आली आहे़ त्यामुळे पहिला दिवस निरंक, दुसरा दिवस गोंधळात गेल्यानंतर आता साडेतीन लाखांवर शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत़